68th National Film Awards: 'पैठणीच्या गोष्टी'नं मनं जिंकली; राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सायली संजीवचा सिनेमा ठरला सर्वोत्कृष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 05:22 PM2022-07-22T17:22:35+5:302022-07-22T17:23:22+5:30

68th National Film Awards: या पुरस्कार सोहळ्यांमध्ये साऊथ, बॉलिवूड चित्रपटांसह मराठीतील 'गोष्ट एका पैठणीची' (goshta eka paithanichi) या चित्रपटानेही बाजी मारली आहे.

68th national film awards updates in best marathi film has been announced for goshta eka paithanichi | 68th National Film Awards: 'पैठणीच्या गोष्टी'नं मनं जिंकली; राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सायली संजीवचा सिनेमा ठरला सर्वोत्कृष्ट

68th National Film Awards: 'पैठणीच्या गोष्टी'नं मनं जिंकली; राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सायली संजीवचा सिनेमा ठरला सर्वोत्कृष्ट

googlenewsNext

68th National Film Awards: मनोरंजन क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाचा आणि मानाचा समजल्या जाणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची नुकतीच घोषणा झाली आहे. शुक्रवार (२२ जुलै) संध्याकाळी ४ वाजता ६८ व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. विशेष म्हणजे या पुरस्कार सोहळ्यांमध्ये साऊथ, बॉलिवूड चित्रपटांसह मराठीतील 'गोष्ट एका पैठणीची' (goshta eka paithanichi) या चित्रपटानेही बाजी मारली आहे. या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपट हा पुरस्कार पटकवत मराठी कलाविश्वाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

शंतनू गणेश रोडे दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेत्री सायली संजीव, सुव्रत जोशी, शशांक केतकर, मिलिंद गुणाजी ही दिग्गज कलाकार मंडळी मुख्य भूमिकेत झळकली आहेत. प्लॅनेट मराठी, गोल्डन रेशो फिल्म्सनं, लेकसाईड प्रोडक्शनने 'गोष्ट एका पैठणीची' या चित्रपटाची निर्मिती केली असून अक्षय बर्दापूरकर, अभयानंद सिंग आणि चिंतामणी दगडे हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. 

 माहिती प्रेस इनफॉर्मेशन ब्युरोच्या अधिकृत ट्विटर पेजवरून या राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. या पुरस्कारांसाठी दरवर्षी हिंदीसह, मराठी, कन्नड, मणिपुरी, पंजाबी, तमिळ, तेलुगू, छत्तीसगढ़ी, हरियाणवी या भाषांसह इतर प्रादेशिक भाषांमधील चित्रपटांना नामांकन दिली जातात. विशेष म्हणजे यावेळी मराठी चित्रपटाने बाजी मारल्यामुळे सर्व स्तरांमधून मराठी कलाकारांचं कौतुक केलं जात आहे.

दरम्यान,१९५४ साली हा पुरस्कार सोहळा सुरु करण्यात आला. यात चित्रपट, साहित्य आणि कला क्षेत्रात सर्वोत्कृष्ट आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलाकारांना भारत सरकारकडून हे पुरस्कार दरवर्षी दिले जातात. 

Web Title: 68th national film awards updates in best marathi film has been announced for goshta eka paithanichi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.