69th National Film Awards : 'एकदा काय झालं'साठी सलील कुलकर्णींना राष्ट्रीय पुरस्कार, राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2023 16:13 IST2023-10-17T16:13:12+5:302023-10-17T16:13:34+5:30
यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कारात 'एकदा काय झालं' हा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला. या चित्रपटासाठी सलील कुलकर्णींना राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.

69th National Film Awards : 'एकदा काय झालं'साठी सलील कुलकर्णींना राष्ट्रीय पुरस्कार, राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव
68th National Film Awards: 69व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचा वितरण सोहळा आज (१७ ऑक्टोबर) पार पडला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांना सन्मानित करण्यात आलं. यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कारात एकदा काय झालं या मराठी चित्रपटाने मोहोर उमटवली. या चित्रपटासाठी सलील कुलकर्णींना राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
ऑगस्ट महिन्यात राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती. आज या राष्ट्रपतींच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात आले. गेली काही वर्ष सतत मराठी सिनेमांना सर्वोत्कृष्ट सिनेमांचे राष्ट्रीय पुरस्कार, अभिनेत्यांना, दिग्दर्शकांना राष्ट्रीय पुरस्कार मिळत आहेत. या वर्षी सलील कुलकर्णींनी अभिनित आणि दिग्दर्शित केलेला 'एकदा काय झालं' चित्रपट सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा ठरला. तर गेल्या वर्षी सायली संजीवच्या गोष्ट एका पैठणीची मराठी चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कारावर नाव कोरलं होतं.
डॉ. सलील कुलकर्णी दिग्दर्शित या सिनेमात एका गोष्ट सांगणाऱ्या बाबाची कहाणी सादर केली आहे. मनोरंजनाच्या माध्यमातून मुलांपर्यंत विचार पोहोचवण्याची कला अवगत असलेला बाबा आणि त्याच्या मुलाची, त्याच्या कुटुंबाची, त्याच्या शाळेची, त्याच्या प्रामाणिकपणाची आणि त्याच्या दृढ निश्चयांची गोष्ट या चित्रपटात यात आहे. याला संगीतही सलील यांनीच दिलं. यात गोष्टी आणि नाटकांच्या माध्यमातून मुलांना शिक्षण देण्याला प्राधान्य देणारा शिक्षक किरण आणि त्याचा मुलगा चिंतन यांची भावस्पर्शी कथा यात आहे.