मराठी सिनेइंडस्ट्रीसाठी तेजस्विनी पंडितनं उचललं मोठं पाऊल, बॉलिवूडच्या या निर्मात्यासोबत केली हातमिळवणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2024 12:30 PM2024-03-05T12:30:35+5:302024-03-05T12:39:43+5:30

Tejaswini Pandit : अभिनेत्री तेजस्विनी पंडितने अभिनयासोबतच निर्मिती क्षेत्रातही प्रवेश केला आणि आता तेजस्विनी लवकरच आपल्यासमोर भव्यदिव्य कलाकृती घेऊन येणार आहे.

A big step taken by Tejaswini Pandit for Marathi Cine Industry, joined hands with this Bollywood producer. | मराठी सिनेइंडस्ट्रीसाठी तेजस्विनी पंडितनं उचललं मोठं पाऊल, बॉलिवूडच्या या निर्मात्यासोबत केली हातमिळवणी

मराठी सिनेइंडस्ट्रीसाठी तेजस्विनी पंडितनं उचललं मोठं पाऊल, बॉलिवूडच्या या निर्मात्यासोबत केली हातमिळवणी

अभिनेत्री तेजस्विनी पंडितने अभिनयासोबतच निर्मिती क्षेत्रातही प्रवेश केला आणि आता तेजस्विनी लवकरच आपल्यासमोर भव्यदिव्य कलाकृती घेऊन येणार आहे. यासाठी तिने बॉलिवूडला अनेक दर्जेदार चित्रपट देणाऱ्या साजिद नाडियाडवाला एंटरटेन्मेंटसोबत हातमिळवणी केली आहे. नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेंनमेंट, जोफिएल एंटरप्राईज प्रस्तुत, वर्धा नाडियाडवाला, सह्याद्री फिल्म्स यांच्या नेतृत्वाखाली हे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

याबद्दल तेजस्विनी पंडित म्हणते, ''ही भागीदारी खरोखरच अपवादात्मक आहे. माझ्यासाठी आणि माझ्या संपूर्ण टीमसाठी हा एक सन्मान आहे. ऐतिहासिकदृष्ट्या मराठी चित्रपट हे प्रतिभावान कलाकार आणि निर्मितीसाठी ओळखले जातात. ज्यांनी आजवर प्रेक्षकांना अनेक अविस्मरणीय आशय दिले आहेत. परंतु मराठी चित्रपटांमध्ये भव्यतेचा आणि वितरणाचा अभाव अनेकदा दिसतो. आता प्रतिष्ठित निर्माते साजिद नाडियाडवाला आणि वर्धा नाडियाडवाला यांच्यासोबत एकत्र येऊन आम्ही हे चित्र बदलण्याचा प्रयत्न करणार आहोत. ही भागीदारी 'गेम चेंजर' ठरणारी असेल. जी प्रेक्षकांना मोठ्या सिनेमॅटिक प्रवासाचा अनुभव घेण्यासाठी एक विशाल कॅनव्हास देईल. या सहकार्याबद्दल आम्हाला अत्यंत आनंद आहे आणि आमची ही असाधारण कलाकृती प्रेक्षकांसमोर सादर करण्यासाठी आम्हीही खूप उत्सुक आहोत.''


तर निर्मात्या वर्धा नाडियाडवाला यांनी सांगितले की, ''मराठी चित्रपटांसाठी सह्याद्री फिल्मसोबत भागीदारी करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. माझे या भूमीशी, संस्कृतीशी आणि भाषेशी विशेष नाते आहे. हे आमचे घर आहे. त्यामुळे हे चित्रपट माझ्यासाठी खूप खास असतील. यात आम्हाला तेजस्विनीची साथ लाभली आहे. तेजस्विनी एक चतुरस्त्र व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे तिचा दृष्टिकोन खूपच वेगळा असणार, याची आम्हाला जाणीव असून मराठी चित्रपटाबद्दलच्या अंतर्दृष्टीवर आमचा विश्वास आहे. म्हणूनच तिच्या सहकार्याने प्रभावी कथा सादर करण्याचे उद्दिष्ट आहे. तेजस्विनीसोबत आम्ही आमच्या या नवीन प्रवासाला सुरुवात करत आहोत. तिच्यासोबत आम्ही प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकतो आणि यासाठी आम्हाला प्रेक्षकांचे प्रेम आणि सहकार्य गरजेचे आहे.'' 

Web Title: A big step taken by Tejaswini Pandit for Marathi Cine Industry, joined hands with this Bollywood producer.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.