अमृताला चाहत्याने चक्क घातली लग्नाची मागणी, अभिनेत्री म्हणाली- "पण मी तुझ्यासोबत..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 08:48 IST2025-01-21T08:47:59+5:302025-01-21T08:48:30+5:30

Amruta Khanvilkar : अभिनेत्री अमृता खानविलकर हिने इंस्टाग्रामवर चाहत्याने केलेल्या मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे आणि त्याच्या प्रश्नाचे उत्तरही दिले आहे.

A fan proposed to Amruta Khanvilkar, actress said - "But I will be with you..." | अमृताला चाहत्याने चक्क घातली लग्नाची मागणी, अभिनेत्री म्हणाली- "पण मी तुझ्यासोबत..."

अमृताला चाहत्याने चक्क घातली लग्नाची मागणी, अभिनेत्री म्हणाली- "पण मी तुझ्यासोबत..."

अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ती सतत चर्चेत येत असते. कधी फोटोंमुळे तर कधी आगामी प्रोजेक्टमुळे. पण यावेळी ती एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आलीय. आता तिला चक्क एका चाहत्याने सोशल मीडियावर लग्नाची मागणी घातली आहे. या चाहत्याच्या मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर करत अभिनेत्रीने त्याला चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे.

अभिनेत्री अमृता खानविलकर हिने इंस्टाग्रामवर चाहत्याने केलेल्या मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे आणि त्याच्या प्रश्नाचे उत्तरही दिले आहे. त्या चाहत्याने लिहिले की, अमृता खानविलकर, मला तुझ्याशी लग्न करायला आवडेल. मी इंटरेस्टेड आहे. प्लीज कायमस्वरुपी नवरा. मी इंटरेस्टेड आहे. मी इंडियन सुनील. या चाहत्याच्या मेसेजवर अमृताने लिहिले की, हॅलो इंडियन सुनील. मला ही ऑफर दिल्याबद्दल मी आभारी आहे. पण मी तुझ्यासोबत लग्न नाही करू शकत. जरी तुला कायमस्वरुपी नवरा व्हायचे असेल तरी. खरंच सॉरी. कलाकारांना अनेकदा चाहत्यांच्या अशा मागण्यांना सामोरे जावे लागते. मात्र अमृताने त्या चाहत्याला योग्य उत्तर देत त्याचा हा प्रस्ताव नाकारला आहे. 

वर्कफ्रंट
अमृता खानविलकरने मराठीसोबत बॉलिवूडमध्येही आपले स्थान निर्माण केलंय. शेवटची ती संगीत मानापमान सिनेमात झळकली होती. यात तिने केमिओ केला होता. या सिनेमात तिने केलेला डान्स चाहत्यांना खूप भावला आहे. याशिवाय ती धर्मरक्षक महावीर संभाजी महाराज सिनेमात महाराणी येसूबाईच्या भूमिकेत दिसली होती. याशिवाय तिचा लाइक आणि सबस्क्राईब या चित्रपटातही पाहायला मिळाली. मात्र या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर हवा तसा रिस्पॉन्स मिळाला नाही.

Web Title: A fan proposed to Amruta Khanvilkar, actress said - "But I will be with you..."

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.