जयवंत वाडकर यांच्या घरी आली नवी पाहुणी, केलं जंगी स्वागत; व्हिडीओ झाला व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2024 04:06 PM2024-02-03T16:06:08+5:302024-02-03T16:06:48+5:30

Jaywant Wadkar : अभिनेते जयवंत वाडकर यांनी मराठीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. आतापर्यंत त्यांनी विविध भूमिका साकारल्या आहेत. सध्या ते चर्चेत आले आहेत.

A new guest came to Jaywant Wadkar's house, gave a warm welcome; The video went viral | जयवंत वाडकर यांच्या घरी आली नवी पाहुणी, केलं जंगी स्वागत; व्हिडीओ झाला व्हायरल

जयवंत वाडकर यांच्या घरी आली नवी पाहुणी, केलं जंगी स्वागत; व्हिडीओ झाला व्हायरल

अभिनेते जयवंत वाडकर (Jaywant Wadkar) यांनी मराठीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. आतापर्यंत त्यांनी विविध भूमिका साकारल्या आहेत. सध्या ते चर्चेत आले आहेत. त्याला कारणही तसे खास आहे. त्यांच्या घरी नवीन पाहुणी आली आहे. तर ही पाहुणी कोण आहे, हे जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल ना. तर त्यांनी नवीन कार घातली आहे. त्यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत ही खुशखबरी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

जयवंत वाडकर यांनी महिंद्रा XUV 400 कार घेतली आहे. त्यांनी त्याचा सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत पाहायला मिळतंय की, जयवंत वाडकर कार शोरुममध्ये दिसत आहेत आणि गाडीवरील कव्हर काढून गाडीची झलक दाखवली. त्यानंतर केक कट करून आनंद व्यक्त केला. त्यांच्या या व्हिडीओला चाहत्यांची खूप पसंती मिळत आहे. इतकेच नाही तर चाहते अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.  

जयवंत वाडकर मुंबईतील गिरगाव येथे लहानाचे मोठे झाले आहेत. एका कोळी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील मासेमारी करायचे. जयवंत वाडकर यांनी १९८८मध्ये 'तेजाब' या हिंदी चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. तर मराठीत त्यांनी त्याच वर्षी एक गाडी बाकी अनाडी या चित्रपटातून ते मराठी चित्रपटसृष्टीत आले. आतापर्यंत त्यांचे मराठीत १०० हून अधिक तर हिंदीत ४५ हून अधिक चित्रपट रिलीज झाले आहेत. नुकतेच जयवंत वाडकर यांची बाबा ही शॉर्टफिल्म रिलीज झाली. यात त्यांची मुलगी स्वामिनीने काम केले आहे. 
 

Web Title: A new guest came to Jaywant Wadkar's house, gave a warm welcome; The video went viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.