'आजपर्यंत उत्तम भूमिका त्याने...', ‘चौक’चित्रपटाच्या दिग्दर्शकासाठी सुबोध भावेने लिहिली खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2023 05:00 PM2023-06-02T17:00:55+5:302023-06-02T17:04:35+5:30

सुबोध भावेचं ‘चौक’ चित्रपटाच्या दिग्दर्शकासोबत खास कनेक्शन आहे, याचा उलगडा त्याने पोस्टमधून केला आहे.

A special post written by Subodh Bhave for the director of the movie Chowk | 'आजपर्यंत उत्तम भूमिका त्याने...', ‘चौक’चित्रपटाच्या दिग्दर्शकासाठी सुबोध भावेने लिहिली खास पोस्ट

'आजपर्यंत उत्तम भूमिका त्याने...', ‘चौक’चित्रपटाच्या दिग्दर्शकासाठी सुबोध भावेने लिहिली खास पोस्ट

googlenewsNext

मालिकांपासून चित्रपटांपर्यंत अभिनयापासून दिग्दर्शनापर्यंत विविध क्षेत्रात स्वत:ला सिद्ध करणारा अभिनेता म्हणजे सुबोध भावे (Subodh Bhave).सुबोध उत्तम अभिनेता. पण अभिनेता म्हणून सिद्ध केल्यानंतर तो कथाकार झाला, दिग्दर्शक झाला.डॉ. काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटामध्ये त्याने काशीनाथ घाणेकर यांची भूमिका अतिशय समर्थपणे साकारली. आज सुबोधची नव्यानं ओळख करून देण्याची गरज नाही. 

सुबोध कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सुबोधने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट त्याने चौक सिनेमाच्या दिग्दर्शकाबद्दल केली आहे. ही पोस्ट शेअर करताना यासोबत त्याने एक फोटोही शेअर केला आहे. 


सुबोधची पोस्ट
''पुरूषोत्तम करंडक स्पर्धेमध्ये माझा सह स्पर्धक असलेला दया गायकवाड दिग्दर्शक म्हणून त्याचा पहिला चित्रपट घेऊन येत आहे. आज महाराष्ट्रात तो प्रदर्शित होत आहे. आज पर्यंत उत्तम भूमिका त्याने अभिनेता म्हणून वठवल्या
आणि मला खात्री आहे दिग्दर्शक म्हणून सुध्दा त्याने उत्तम कामगिरी केली असेल. दया दिग्दर्शक म्हणून तुझ्या या पहिल्या इनिंग साठी तुला मनापासून शुभेच्छा नक्की चित्रपट पहा....''

 

गेल्या काही दिवसांपासून मराठी कलाविश्वात चौक या सिनेमाची जोरदार चर्चा रंगली होती. अनुराधा प्रोडक्शनचा हा सिनेमा २ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.  या सिनेमात त्याच्यासोबत अभिनेत्री संस्कृती बालगुडे  स्क्रीन शेअर करणार आहे. या चित्रपटाची निर्मिती दिलीप लालासाहेब पाटील यांनी केली आहे. तर,कथा, पटकथा , संवाद आणि दिग्दर्शन देवेंद्र गायकवाड यांचं आहे.
 

Web Title: A special post written by Subodh Bhave for the director of the movie Chowk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.