"माझ्या आयुष्यातली खूप महत्वाची व्यक्ती!", मृणाल कुलकर्णींची सासूबाईंच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 13:29 IST2025-01-30T13:26:44+5:302025-01-30T13:29:17+5:30
Mrinal Kulkarni : मृणाल कुलकर्णी यांनी सासूबाईंच्या वाढदिवसानिमित्त फेसबुकवर खास पोस्ट शेअर केली आहे.

"माझ्या आयुष्यातली खूप महत्वाची व्यक्ती!", मृणाल कुलकर्णींची सासूबाईंच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट
मृणाल कुलकर्णी (Mrinal Kulkarni) मराठी सिनेमातील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. त्यांनी अभिनयाव्यतिरिक्त आपल्या सौंदर्याने रसिकांना भुरळ घातली आहे. मराठीसह हिंदीतही त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. दरम्यान अभिनेत्रीने त्यांच्या सासूबाईंच्या नव्वदाव्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे.
मृणाल कुलकर्णी यांनी सासूबाईंच्या वाढदिवसानिमित्त फेसबुकवर खास पोस्ट लिहिली आहे. त्यांनी फोटो शेअर करत लिहिले की, ९० व्या वर्षात प्रसन्न पदार्पण!! माझ्या सासूबाई या माझ्या आयुष्यातली खूप महत्वाची व्यक्ती! ज्यांच्या जीवनावरच्या प्रेमाने, उत्साहाने मला कायमच अचंबित केलं आहे. स्वतः एक यशस्वी स्त्री रोग तज्ज्ञ आणि आम्हा सर्वांना कायम भक्कम पाठिंबा देणारी ही व्यक्ती. यांच्याच आग्रहामुळे मी विराजस कुलकर्णीला निर्धास्तपणे त्यांच्यावर सोपवून माझी कारकीर्द घडवू शकले.आज त्यांचे आशीर्वाद आम्हाला आहेत हे आमचं मोठे भाग्य !!! त्यांना निरोगी आणि प्रसन्न आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना !!
वर्कफ्रंट
मृणाल कुलकर्णी यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर शेवटच्या त्या 'गुलाबी' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या होत्या. मृणाल कुलकर्णी यांनी आजवरच्या करिअरमध्ये अनेक पौराणिक आणि ऐतिहासिक भूमिका केल्या आहेत. त्यांनी मराठीसह बॉलिवूड सिनेमांमध्येही काम केले आहे. इतकेच नाही तर अभिनय क्षेत्रात नशीब आजमावल्यानंतर त्यांनी त्यांचा मोर्चा दिग्दर्शनाकडे वळवला.