'डंका' चित्रपटात झळकणार 'आई कुठे काय करते' फेम अक्षया गुरव, साकारणार ही भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2024 16:56 IST2024-06-26T16:55:28+5:302024-06-26T16:56:09+5:30
Akshaya Gurav : अभिनेत्री अक्षया गुरव लवकरच 'डंका' या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तिने पम्मीची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट १९ जुलैला रिलीज होणार आहे.

'डंका' चित्रपटात झळकणार 'आई कुठे काय करते' फेम अक्षया गुरव, साकारणार ही भूमिका
'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) मालिकेला कमी कालावधीत चांगलीच लोकप्रियता मिळाली. या मालिकेतील सर्व कलाकार घराघरात पोहचले. या मालिकेत झळकलेली अभिनेत्री अक्षया गुरव(Akshaya Gurav)लाही मायाच्या भूमिकेत चांगलीच पसंती मिळाली. या मालिकेतून अक्षया बाहेर पडली आहे. आता लवकरच ती डंका या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तिने पम्मीची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट १९ जुलैला रिलीज होणार आहे.
रुद्र एंटरटेनमेंट स्टुडिओज् आणि गणराज स्टुडिओज् प्रस्तुत ‘डंका… हरीनामाचा’ हा मराठी चित्रपट १९ जुलैला चित्रपटगृहात दाखल होतोय. रविंद्र फड निर्मित या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन श्रेयश जाधव यांनी केले आहे. हा चित्रपट पांडुरंगाच्या निस्सीम भक्तीवर आधारित आहे. निर्माता रविंद्र फड हे स्वतः वारकरी संप्रदायातील असून विठ्ठलाच्या भक्तीपोटी त्यांनी हा चित्रपट विठूरायाला भक्तीभावाने समर्पित केला आहे.
डंका चित्रपटात अक्षया व्यतिरिक्त सयाजी शिंदे, अनिकेत विश्वासराव, प्रियदर्शन जाधव, अविनाश नारकर, किरण गायकवाड, रसिक सुनील, निखिल चव्हाण, मयूर पवार, किरण भालेराव, कबीर दुहान सिंग, महेश जाधव हे कलाकार दिसणार आहेत. कार्यकारी निर्माते ऋषिकेश आव्हाड आहेत. अमोल कागणे फिल्म्स, फिल्मास्त्र स्टुडिओजच्या वतीने या चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी फिल्मास्त्र स्टुडिओज, अमेय खोपकर, अमोल कागणे, प्रणीत वायकर यांनी सांभाळली आहे. ‘डंका… हरीनामाचा’ चित्रपट मराठीतच नव्हे तर हिंदी, तेलगू , तामिळ आणि कन्नड भाषेत १९ जुलैला प्रदर्शित होणार आहे.