'आई कुठे काय करते' फेम अनघाला लागली मोठी लॉटरी, याबाबत अश्विनी महांगडे म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2023 16:22 IST2023-05-20T16:21:49+5:302023-05-20T16:22:12+5:30
Ashvini Mahangade :अश्विनी महांगडेने इंस्टाग्रामवर आपल्या चाहत्यांना खुशखबर दिली आहे.

'आई कुठे काय करते' फेम अनघाला लागली मोठी लॉटरी, याबाबत अश्विनी महांगडे म्हणाली...
मराठी मनोरंजन विश्वातील अशीच एक अभिनेत्री म्हणजे आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) फेम अनघा म्हणजेच अभिनेत्री अश्विनी महांगडे (Ashvini Mahangade). अश्विनी सोशल मीडियावर तिच्या विविध पोस्ट्स मधून चर्चेत असते. आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे तेही तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे. अश्विनीने इंस्टाग्रामवर आपल्या चाहत्यांना खुशखबर दिली आहे.
अश्विनी महांगडे नुकतीच महाराष्ट्र शाहीर चित्रपटात झळकली. यात तिने साकारलेल्या भूमिकेचं सर्वत्र खूप कौतुक झाले. त्यानंतर आता ती आणखी एका चित्रपटात झळकणार आहे. याबद्दल तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. अश्विनीने चित्रपटाचे पोस्टर शेअर करत लिहिले की, इंदूर संस्थानचे संस्थापक, वीर सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन करते. आज अतिशय आनंदाची बातमी माझ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. खुप मोठी जबाबदारी, मनावर दडपण आणि तितकाच आनंद होत आहे. माझी प्रमुख भुमिका असलेला "पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर" या चित्रपटाची आज घोषणा झाली. रसिक मायबाप प्रेक्षकहो याही चित्रपटावर आपण प्रेम करावे. तुमच्या आशीर्वादाची गरज आहे.
अश्विनी महांगडेची मुख्य भूमिका असलेला हा तिचा पहिलाच चित्रपट आहे. यात अहिल्याबाई होळकर यांची भूमिका अश्विनीने साकारली आहे. तिच्या या पोस्टवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. अश्विनीचे चाहते तिला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. अश्विनी महाराष्ट्र शाहीर व्यतिरिक्त बॉईज या चित्रपटातही झळकली आहे.