या सिनेमासाठी आरती सोळंकी झाली मांत्रिक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2018 09:01 AM2018-03-12T09:01:19+5:302018-03-12T14:31:19+5:30

आरती सोळंकी हे नाव एेकताच आपल्या डोळ्यासमोर विनोदाची षटकार दिसू लागतात.'४ इडियट','येड्यांची जत्रा','वाजलाच पाहिजे' आणि 'लूज कंट्रोल' या सर्व ...

The aarti is considered for this movie | या सिनेमासाठी आरती सोळंकी झाली मांत्रिक

या सिनेमासाठी आरती सोळंकी झाली मांत्रिक

googlenewsNext
ती सोळंकी हे नाव एेकताच आपल्या डोळ्यासमोर विनोदाची षटकार दिसू लागतात.'४ इडियट','येड्यांची जत्रा','वाजलाच पाहिजे' आणि 'लूज कंट्रोल' या सर्व सिनेमात आपल्या विनोदी अभिनयाने मराठी प्रेक्षकांची मने जिंकणारी आरती आता वेगळ्याच रुपात दिसणार आहे.होय अखिल देसाई दिग्दर्शित 'मोर्चा' या सिनेमात आरती प्रथमच खलनायिकाच्या भूमिकेत झळकणार आहे. आजवर तिने अशा प्रकारची भूमिका केलेली नाही. मोर्चा सिनेमात आरती प्रथमच मांत्रिकाची साकारत आहे. त्यामुळे एकदम वेगळ्या प्रकारची अशी भूमिका मला साकारता आल्याचे आरती सांगते.ती पुढे सांगते की, हल्लीच्या काळात अंधश्रद्धेच्या नावाखाली बळी घेण्याचे प्रकार वाढले आहेत.तेही निव्वळ स्वतःच्या स्वार्थापायी.. आणि ज्या लोकांनी या अंधश्रद्धेला विरोध दर्शवला त्यांचे देखील इथे बळी घेतले गेले आहेत.हा एक महत्वाचा मुद्दा देखील सिनेमातून दर्शवण्यात आला आहे.'मोर्चा' सिनेमात आरती सोबत संजय खापरे, कमलेश सावंत, अंशुमन विचारे, अनिकेत केळकर, उदय सबनीस, द्युशांत वाघ या सारखी तगडी टीम पाहायला मिळणार आहे. 'मोर्चा' सिनेमाच्या माध्यमातून आरती प्रथमच नकारात्मक भूमिकेत रसिकांने पाहणेही रंजक ठरणार आहे.

आरतीप्रमाणेच या सिनेमात अभिनेता अंशुमन विचारेनेही एक नवीन आव्हाना स्विकारले आहे.या सिनेमासाठी तो चक्क पाश्वर्यगायक बनला आहे.अंशुमन याबद्दल सांगतो की,अखिल देसाई हे माझे चांगले मित्र आहेत.'मोर्चा' या त्यांच्या सिनेमात एक वेगळ्या धाटणीचे गाणे होते.जे आजच्या सिस्टीमवर भाष्य करते.मी यापूर्वी काही टीव्ही मालिकांसाठी  गायले होते त्यामुळेच सिनेमाच्या या  गाण्याला मी पूर्ण न्याय देऊ शकेल अशी खात्री त्यांना होती.भरत सिंह,विकी - किरण आणि लव - कुश यांचे संगीत लाभलेल्या या गाण्याचे गीतकार संकेत तटकरे असून सिनेमातील इतर गाणी संदेश अहिरे,प्रसाद दाणी,अखिल देसाई यांनी लिहिली आहेत तर इतर गाणी आदर्श शिंदे,राहुल देशमाने यांनी गायली आहेत.एकांकिकांमधून घडलेला अंशुमन आज नाटक आणि सिनेमा क्षेत्रात उत्तम स्थिरावला आहे.'श्वास','पोस्टर बॉईज','स्वराज्य','विठ्ठला शप्पथ' अशा अनेक मराठी सिनेमातून आपल्या समोर आलेला अंशुमन आता पार्श्वगायकाच्या भूमिकेतून आपल्या समोर येत आहे.

 

Web Title: The aarti is considered for this movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.