अभिजीत साटम आणि शिवदर्शनची या कारणामुळे पुन्हा जमली जोडी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2018 05:09 AM2018-06-05T05:09:21+5:302018-06-05T10:39:21+5:30

पद्मश्री शाहिर साबळे यांचा वारसा चालवत रसिकांची सेवा करण्याचं व्रत जोपासणारा शिवदर्शन साबळे आपला चौथा सिनेमा घेऊन येतोय.‘लगी तो ...

Abhijeet Satam and Shiva Darshan re-assembled due to this reason | अभिजीत साटम आणि शिवदर्शनची या कारणामुळे पुन्हा जमली जोडी

अभिजीत साटम आणि शिवदर्शनची या कारणामुळे पुन्हा जमली जोडी

googlenewsNext
्मश्री शाहिर साबळे यांचा वारसा चालवत रसिकांची सेवा करण्याचं व्रत जोपासणारा शिवदर्शन साबळे आपला चौथा सिनेमा घेऊन येतोय.‘लगी तो छगी’ असं काहीसं अनोखं शीर्षक असलेल्या या सिनेमाचं दिग्दर्शन शिवदर्शनने केलं आहे.सस्पेन्स-कॉमेडी-थ्रीलर पठडीत मोडणाऱ्या या सिनेमाच्या दिग्दर्शनासोबतच शिवदर्शनने दिप्ती विचारे,स्वाती फडतरे आणि अजित पाटील यांच्या साथीने या सिनेमाची निर्मितीही केली आहे. 

या सिनेमाच्या निमित्ताने अभिजीत साटम पुन्हा एकदा शिवदर्शनच्या सिनेमाचा नायक बनला आहे. यापूर्वी शिवदर्शनच्या पदार्पणाच्या सिनेमात अभिजीतने महत्त्वपूर्ण भूमिकेत सर्वांना आश्चर्यचकित केलं होतं.या सिनेमातील अभिजीतची भूमिकाही प्रेक्षकांना एक सुखद धक्का देणारी ठरणार आहे.या सिनेमात त्याने एका अडचणीत सापडलेल्या तरूणाची व्यक्तिरेखा साकारली आहे. या अडचणीतून तो कशाप्रकारे सुखरूप बाहेर पडतो ते या सिनेमात पाहायला मिळेल.उत्कंठावर्धक कथानकाला शिवदर्शनने उत्तम सादरीकरण आणि कर्णमधुर संगीताची जोड दिली आहे. अभिजीतसोबत या सिनेमात निकीता गिरीधर,रविंदर सिंग बक्षी, मिलिंद उके, योगेश सोमण,असित रेडीज, शैलाकाणेकर, राजू बावडेकर, सागर आठलेकर, महेश सुभेदार, अक्षय भोसले आदी कलाकारांच्याही भूमिका आहेत.थोडक्यात काय तर ‘लगी तो छगी’या सिनेमाच्या माध्यमातून रूपेरी पडद्यावर षटकार ठोकण्याची पूर्ण तयारी शिवदर्शनने केली आहे.

शिबूला कायम वेगळया वाटेने जाणाऱ्या  पटकथांनी आकर्षित केलं आहे. सिनेमाच्या माध्यमातून केवळ  मनोरंजन न करता कायम त्याद्वारे काहीतरी सांगण्याचा प्रयत्न त्याने केला आहे. ‘लगी तो छगी’ हा सिनेमासुद्धा त्याच प्रकारचा असल्याचं सांगत शिबू म्हणाला की, हा कॉमेडी-सस्पेन्स-थ्रीलर आहे. थ्रील हे सिनेमाचं अविभाज्य अंग आहे. सिनेमा कोणत्याही प्रकारचा असला तरी पटकथेत थ्रील असणं गरजेचं असतं. या सिनेमाची कथा तशाच प्रकारची असल्याने रसिकांना शेवटच्या क्षणापर्यंत खुर्चाला खिळवून ठेवण्यात यशस्वी होईल असंही शिबू मानतो.या सिनेमात अभिजीत सोबत निकीता गिरीधर, रविंदर सिंग बक्षी, मिलिंद उके, योगेश सोमण, असित रेडीज,शैला काणेकर, राजू बावडेकर, सागर आठलेकर, महेश सुभेदार, अक्षय भोसले आणि सुरेंदर पाल आदी कलाकारांच्याही भूमिका आहेत. 

Web Title: Abhijeet Satam and Shiva Darshan re-assembled due to this reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.