प्राजक्ता माळीचा फॅन आहे अभिजीत सावंत, 'फुलवंती' बघून म्हणतो- "तिला बघायला..."

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2024 05:24 PM2024-10-11T17:24:20+5:302024-10-11T17:25:05+5:30

अभिजीत सावंतनेही या 'फुलवंती'च्या प्रिमियरला हजेरी लावली होती. याचा व्हिडिओ त्याने शेअर केला आहे. 

abhijeet sawant is a fan of prajakta mali watch her phulwanti marathi movie | प्राजक्ता माळीचा फॅन आहे अभिजीत सावंत, 'फुलवंती' बघून म्हणतो- "तिला बघायला..."

प्राजक्ता माळीचा फॅन आहे अभिजीत सावंत, 'फुलवंती' बघून म्हणतो- "तिला बघायला..."

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या 'फुलवंती' सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमात प्राजक्ताने मुख्य भूमिका साकारली असून 'फुलवंती'मधून तिने निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं आहे. 'फुलवंती' सिनेमा आज सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. नुकताच या सिनेमाचा प्रिमियर शो पार पडला. यासाठी सेलिब्रिटींनीही हजेरी लावली होती. अभिजीत सावंतनेही या 'फुलवंती'च्या प्रिमियरला हजेरी लावली होती. याचा व्हिडिओ त्याने शेअर केला आहे. 

प्राजक्ता माळीचे खूप चाहते आहेत. पण, बिग बॉस मराठी फेम अभिजीत सावंतही प्राजक्ताचा मोठा चाहता आहे. त्यामुळेच 'फुलवंती' बघायला जातानाही अभिजीत खूप उत्साही होता. खुद्द अभिजीतनेच प्राजक्ताचा मोठा चाहता असल्याचं व्हिडिओत सांगितलं आहे. अभिजीत म्हणतो, "मी चाललोय 'फुलवंती'च्या प्रिमियरला. प्राजक्ता माळीला बघायला मिळेल. मी तिचा खूप मोठा चाहता आहे". 


'फुलवंती' ही भारतभर किर्ती असलेली नर्तिका असून ती कार्यक्रमाच्या निमित्तानं पुण्यातील पेशवे दरबारात येते. तिथे तिची व्यंकटध्वरी नरसिंह शास्त्री यांच्याशी भेट होते. त्यांच्या भेटीनंतर तिच्या आयुष्याला अनपेक्षित वळण लागतं. नृत्यांगना 'फुलवंती' आणि प्रकांडपंडीत 'व्यंकट शास्त्री' यांच्यातील पैज व आव्हानावर हा चित्रपट बेतला आहे. कला व बुद्धिमत्तेतील युद्ध सिनेमात पाहायला मिळणार आहे. 

'फुलवंती' सिनेमात प्राजक्ता माळी, गश्मीर महाजनी, स्नेहल तरडे, प्रसाद ओक, वैभव मांगले, हृषिकेश जोशी या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. तर समीर चौघुले, वनिता खरात, पृथ्विक प्रताप, गौरव मोरे, रोहित माने हे कलाकारही या सिनेमात झळकले आहेत. स्नेहल तरडेंनी या सिनेमातून दिग्दर्शनात पाऊल ठेवलं आहे. 

Web Title: abhijeet sawant is a fan of prajakta mali watch her phulwanti marathi movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.