लक्ष्मीकांत बेर्डेंचा हा गुण घ्यायचाय अभिनयला, म्हणाला - "...फक्त तेवढच घेऊ शकतो"
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2023 13:13 IST2023-10-13T13:13:31+5:302023-10-13T13:13:55+5:30
Laxmikant Berde's Son Abhinay Berde : अभिनयनेदेखील लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पावलावर पाऊल ठेवत मराठी चित्रपटसृष्टीत एन्ट्री केली आहे.

लक्ष्मीकांत बेर्डेंचा हा गुण घ्यायचाय अभिनयला, म्हणाला - "...फक्त तेवढच घेऊ शकतो"
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिवंगत अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) यांच्या पावलांवर पाऊल ठेवत त्यांच्या दोन्ही मुलांनी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. स्वानंदी आणि अभिनय या दोघांनीही मराठी चित्रपटात काम केले आहे. ते दोघेही अनेकदा वडिलांबद्दल बोलत असतात. दरम्यान आता एका मुलाखतीत अभिनय लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबद्दल बोलला आहे.
एका मराठी संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत अभिनयला विचारण्यात आले की, कॉमेडीच्या बाबतीत वडिलांचा कोणता गुण घ्यायला तुला आवडेल? त्यावर अभिनय म्हणाला की, मला स्वत:शी प्रामाणिक रहायचे आहे. कारण माझी भूमिका तशी नाही. विनोद बदलला आहे. तसेच सगळ्या गोष्टी बदलल्या आहेत. त्यामुळे मी त्यांच्याकडून प्रेरणा घेऊ शकतो ती म्हणजे टायमिंगची. फक्त तेवढच घेऊ शकतो. त्यामुळे माझ्याकडून प्रयत्न वेगळा आहे. अशी भूमिका त्यांनीही त्यांच्या आयुष्यात कधी कोणत्या सिनेमात केली नसेल. मी माझ्या भूमिकेत जितका खरेपणा टाकता येईल तेवढा प्रयत्न केला आहे.
अभिनयनेदेखील लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पावलावर पाऊल ठेवत मराठी चित्रपटसृष्टीत एन्ट्री केली आहे. ती सध्या काय करते या मराठी चित्रपटातून पहिल्यांदा रुपेरी पडद्यावर झळकला. या चित्रपटातील त्याचे अभिनयाचे खूप कौतूक झाले. त्यानंतर तो अशी ही आशिकी, रंपाट चित्रपटात झळकला आहे. आता तो सिंगल सिनेमात झळकणार आहे. यात त्याच्यासोबत प्रथमेश परब आणि प्राजक्ता गायकवाड मुख्य भूमिकेत दिसणार आहे.