बाईक रायडिंगपेक्षा अभिनय फर्स्ट प्रायोरिटी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2016 12:45 PM2016-06-09T12:45:31+5:302016-06-09T18:15:31+5:30

पप्पी दे पप्पी दे या गाण्यातून अफाट लोकप्रियता प्राप्त केलेली अभिनेत्री स्मिता गोंदकर हिचे बाईक रायडिंग प्रेम हे सर्वानाच ...

Acting first priority than bike riding | बाईक रायडिंगपेक्षा अभिनय फर्स्ट प्रायोरिटी

बाईक रायडिंगपेक्षा अभिनय फर्स्ट प्रायोरिटी

googlenewsNext
्पी दे पप्पी दे या गाण्यातून अफाट लोकप्रियता प्राप्त केलेली अभिनेत्री स्मिता गोंदकर हिचे बाईक रायडिंग प्रेम हे सर्वानाच माहिती आहे. तिने बाईक स्टंट मेनिया सारखा शो देखील केला आहे. तसेच एक मराठमोळी अभिनेत्री स्टंटबाजी करते हे खरचं मराठी इंडस्ट्रीसाठी अभिमानाची गोष्ट आहे. याच अभिनेत्रीने नुकतेच नॅशनल बाईक रायडिंग रॅली चॅम्पियनशीपमध्ये पारितोषिक मिळविले आहे. यासंदर्भातच लोकमत सीएनएक्सशी संवाद साधताना अभिनेत्री स्मिता गोंदकर.



१. तू या नॅशनल रॅली चॅम्पियनशीपमध्ये सहभागी कशी झाली?
- मी काही वर्षापूर्वी बाईक स्टंट मेनिया शो देखील केला होता. पण एकदा सुद्धा कोणत्या प्रकारच्या बाईक रॅलीमध्ये इच्छा असताना ही सहभागी होण्याची संधी मिळाली नाही. आणि अचानक एक दिवस माझा भाऊ म्हणाला, पुण्यामध्ये एक नॅशनल रॅली चॅम्पियनशीप होणार आहे. त्यामध्ये सहभागी व्हायचे का? मी क्षणात हो म्हणाले, आणि माझी ही इच्छा या रॅलीच्या माध्यमातून पूर्ण केली.

२. ही रॅलीचा अनुभव कसा होता?
- ही रॅली करताना खरचं खूप भारी वाटलं. या रॅलीचा प्रवास १५० किमी होता. भारती विदयापीठ ते वेल्हे पासून तीन किमी आतपर्यत होता. आतमध्ये पूर्ण रस्ता ही माती, खडक, अरूंद रस्ते, खड्डयांसारखा होता. तसेच दुसºयासाठी शुट असल्यामुळे काही होऊ नये यासाठी काळजी घेत मी माझी रॅली कंप्लीट केली. 

३. तूझे चाहते देखील तूला बाईक रायडिंग करताना पाहण्यास उत्सुक होते, याविषयी काय म्हणेल?
- हो, मी नॅशनल लेव्हलचा बाईक स्टंट मेनिया या  शो केल्यानंतर माझ्या बाईकर्स चाहत्यांची संख्या देखील महाराष्ट्रासहित इतर ठिकाणी देखील जास्त आहे. त्यामुळे मला सोशलमिडीयावर सतत कमेंटस, मॅसेज यायचे की, तू बाईक रायडिंग सोडली का?  का तू बाईक स्टंटवर एखादा चित्रपट करते? आम्हाला पाहयचं तूला बाईक रायईडिंग करताना अशा अपडेटस सतत पडत असल्यामुळे चाहत्यांची निराशा न ओढवता माझ्यासहित त्यांची देखील ही इच्छा पूर्ण केली. 

४. सध्या अशी चर्चा आहे की, तू या बाईक रॅलीत शुटिंग रद्द करून सहभागी झाली होती?
- हो हे असं काही ऐकून मला खरचं खूप दु:ख झाले. कारण मी या रॅलीसाठी दोन महिन्यांपूर्वीच तारखा घेतल्या होत्या. अजिबात कोणती शुटिंग वगैरे रद्द केली नव्हती. कारण माझ्यासाठी माझं काम फर्स्ट प्रायोरिटी आहे. आणि बाईक रायडिंग ही माझी हॉबी आहे. 

५:  बाईक रायडिंग का अभिनय यापैकी कशाला जास्त प्राधान्य देते?
- माझ्यासाठी अभिनय महत्वाचा आहे. कारण बाईक रायडिंगमधून मला काही प्रुप्र करायचं नाही. जे करायचं ते मी केलं आहे. आणि ते प्रेक्षकांंनी देखील पाहिले आहे. आता मला अभिनय क्षेत्रात अजून यश मिळावायचं आहे. खूप पुढे जायचं आहे.

६. तूला कधी चित्रपटात स्टंट करण्याच्या आॅफर आल्या आहेत का?
- बाईक स्टंट मेनिया या शोनंतर मला बॉलीवुडमधून खरचं स्टंटबाजीसाठी आॅफर येते होत्या. पण मी या सर्व आॅफर नाकारल्या. कारण मी दुसºयांसाठी स्टंट का करू? जे काही स्टंट करायचे आहे.  ती रिस्क मी फक्त माझ्यासाठीच घेईन. 

७. लोकमत सीएनएक्सच्या माध्यमातून काय सांगू इच्छिते?
- सध्या मी माचीवरचा बुधा हा चित्रपट करत आहे. या चित्रपटाच्या शेडयुल्डमधून मी रॅलीसाठी दोन दिवस सुट्टया काढल्या होत्या. पण हा चित्रपट निसर्गावरचा असल्यामुळे वातावरणानुसार निर्मात्यांना अचानक एका गाण्याचे शुट करायचे होते. पण त्यांनी मला खूप समजावून घेतले. तसेच रॅली संपली की, मला लगेच शुटला ज्यायचे होते. त्यामुळे वेळ जास्त जाऊन नये म्हणून त्यांनी शुटिंगदेखील माझ्या लोकेशनपासून जवळच ठेवली होती. यासाठी मी विजय दत्त लोले यांचे खूप आभार मानू इच्छिते. 



Web Title: Acting first priority than bike riding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.