माझा धडधाकट मित्र 15 दिवसांत खाल्ला...! अभिनेता अमोल धावडेंच्या मृत्यूनंतर प्रवीण तरडेंना अश्रू अनावर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2021 12:02 PM2021-04-26T12:02:33+5:302021-04-26T12:04:00+5:30

अभिनेते अमोल धावडे (Amol Dhavade) यांचे नुकतेच कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

actor amol dhavade demise pravin tardes emotional post | माझा धडधाकट मित्र 15 दिवसांत खाल्ला...! अभिनेता अमोल धावडेंच्या मृत्यूनंतर प्रवीण तरडेंना अश्रू अनावर

माझा धडधाकट मित्र 15 दिवसांत खाल्ला...! अभिनेता अमोल धावडेंच्या मृत्यूनंतर प्रवीण तरडेंना अश्रू अनावर

googlenewsNext
ठळक मुद्देदेवूळबंद , मुळशी पॅटर्न या चित्रपटांमध्ये अमोल धावडे झळकले होते. आता तरडेंच्या ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटातही ते दिसणार होते.

कोरोना नावाच्या अदृश्य शत्रूने सध्या अख्ख्या जगाला जेरीस आणले आहे. भारतातही कोरोनाचे थैमान सुरू आहे. डोळ्यांसमोर आप्तांचे मृत्यू होत आहेत. मनोरंजन विश्वानेही कोरोनामुळे अनेक कलाकार गमावले आहेत. अभिनेते अमोल धावडे (Amol Dhavade) यांचे नुकतेच कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अभिनेते व दिग्दर्शक प्रवीण तरडे (Pravin Tarde) हे तर मित्राच्या मृत्यूमुळे कोलमडून गेले आहेत. (Pravin Tarde's emotional post on the demise of actor Amol Dhavade) 
प्रवीण तरडे यांनी फेसबुक पोस्ट शेअर करत अमोल धावडे  यांच्या निधनाची माहिती दिली. देवूळबंद , मुळशी पॅटर्न या चित्रपटांमध्ये ते झळकले होते. आता तरडेंच्या ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटातही ते दिसणार होते.

धडधाकट जिवाभावाचा मित्र अवघ्या 15 दिवसात खाल्ला...

प्रवीण तरडे यांनी एक भावुक करणारी पोस्ट लिहिली. यात ते लिहितात, ‘माझा मित्र अमोल धावडे गेला़ कोरोनाने आज एक निर्व्यसनी रोज व्यायाम करणारा धडधाकट जिवाभावाचा मित्र अवघ्या 15 दिवसात खाल्ला. किती आठवणी ..? 1996 साली मी लिहिलेल्या ‘आणखी एक पुणेकर’ या एकांकीकेत पहिला डायलॉग याने म्हटला होता म्हणुन, माझ्या प्रत्येक सिनेमात एक तरी सीन अमोलसाठी लिहायचोच.. देवूळबंद , मुळशी पॅटर्न आणि आता सरसेनापती हंबीरराव प्रत्येक सिनेमात अमोल आहेच...  11 मे ला अमोलचा वाढदिवस म्हणुन तिन्ही सिनेमांचं डबिंग आत्ता पर्यंत त्याच्या वाढदिवसाला त्याच्या डायलॉगने सुरू करायचो .. हा माझा एक श्रध्देचा भाग होता.. खुप मोठा बांधकाम व्यवसायिक पण एका शब्दावर देईल तो सीन करायला यायचा .. 1999 साली आपण पुरुषोत्तम जिंकला तेंव्हा तु कडकडून मारलेली मीठी कशी विसरू रे मित्रा .. एकत्र नॅशनल खेळलो , एकांकीका केल्या, सिनेमे केले आणि आज एकटाच कुठेतरी निघून गेलास .. तुझा शेवटचा मेसेज होता,‘ बाय बाय प्रविण बहुदा सरसेनापती हंबीरराव सिनेमा पाहायचा राहणार राव’. राहिलाच शेवटी .. डोळ्यातील पाणी थांबत नाही. ये रे आमल्या .. जिथे कुठे असशील सुखी राहा .. नाही तरी मी आणि पिट्या तुला ‘सुखी जीव’ असच म्हणायचो की .. सुखी राहा .. कुटुंबाची काळजी करू नको आम्ही आहोत मित्रा. 
 

Web Title: actor amol dhavade demise pravin tardes emotional post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.