PHOTOS: अभिनेता अनिकेत विश्वासरावची पत्नी दिसते खूप सुंदर, तीदेखील आहे अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 02:32 PM2020-03-21T14:32:20+5:302020-03-21T14:32:57+5:30

अभिनेता अनिकेत विश्वासराव याची पत्नीदेखील अभिनेत्री असून ती खूप ग्लॅमरस दिसते. 

Actor Aniket Vishwarao's wife looks very beautiful, she is also an actress Tjl | PHOTOS: अभिनेता अनिकेत विश्वासरावची पत्नी दिसते खूप सुंदर, तीदेखील आहे अभिनेत्री

PHOTOS: अभिनेता अनिकेत विश्वासरावची पत्नी दिसते खूप सुंदर, तीदेखील आहे अभिनेत्री

googlenewsNext

मराठी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय म्हणजेच अभिनेता अनिकेत विश्वासराव याची पत्नीदेखील अभिनेत्री असून ती खूप ग्लॅमरस दिसते. तिचं नाव स्नेहा चव्हाण असून तिने काही मालिका व चित्रपटात काम केलं आहे. अभिनेता अनिकेत विश्वासराव व अभिनेत्री स्नेहा चव्हाण १० डिसेंबर, २०१८ साली लग्नबेडीत अडकले. त्यांचा विवाह सोहळा नुकताच पुण्यातील एका रिसॉर्टमध्ये पार पडला. हा विवाह सोहळा कुटुंब, जवळचे नातेवाईक व इंडस्ट्रीतील काही निवडक मित्रमैत्रिणींच्या उपस्थित पार पडला.

अनिकेत व स्नेहा हृद्यात समथिंग समथिंग या चित्रपटात एकत्र झळकले होते. या चित्रपटातील त्या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावली आहे. 

स्नेहा चव्हाण यापूर्वी लाल इश्क चित्रपट व सोनी मराठी वाहिनीवरील हृदयात वाजे समथिंक मालिकेत झळकली आहे.  तर अनिकेतने बऱ्याच मराठी सिनेमांमध्ये काम केले असून नुकताच तो चोरीचा मामला चित्रपटात पहायला मिळाला.

स्नेहाने अनिकेत विश्वासराव सोबत लव मॅरेज आहे की अरेंज मॅरेज याबद्दल खुलासा केला. ती म्हणाली की, आमचे अरेंज मॅरेज आहे. आमचे अफेयर वगैरे काहीच नव्हते. तसेच आम्ही एकमेकांना डेटदेखील केले नव्हते. आमच्या लग्नाबाबतचे जून महिन्यात ठरले. आम्ही एक चित्रपट नुकताच एकत्र केला. त्यापूर्वी आम्ही एकमेकांना फक्त ओळखत होतो. तेव्हा आम्ही सहकलाकार व फ्रेंड्स इतकेच नाते आमच्यात होते. माझ्या घरातले माझ्यासाठी जानेवारीपासून मुलगा शोधत होते.

अनिकेतची मावशी आमच्या सोसायटीत राहते. तर मावशी व आई मैत्रीणी असल्यामुळे त्यांचे यासंदर्भात बोलणे झाले. मावशीने माझा अनिकेत नामक पुतण्या आहे. त्याच्यासाठीदेखील मुलगी बघत आहेत. त्याच्याशी बोलून पाहू का? आणि अशाप्रकारे आमच्या लग्नाबाबतचे असे अचानकच ठरले. माझी व त्याची आई एकमेकांशी बोलले. मग, आम्ही दोघे फोनवर बोललो. आम्ही विचार केला की अनोळखी व्यक्तीबरोबर लग्न करण्यापेक्षा आपण एकमेकांना ओळखतो व एकाच क्षेत्रातील आहोत तर लाइफ पार्टनर म्हणून एकमेकांचा विचार नक्कीच करू शकतो.

Web Title: Actor Aniket Vishwarao's wife looks very beautiful, she is also an actress Tjl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.