अभिनेता आस्ताद काळेने लिव्ह-इन रिलेशनशीप अन् पीजीमध्ये राहणाऱ्या तरुणाईला दिला 'हा' मोलाचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2024 01:35 PM2024-06-02T13:35:26+5:302024-06-02T13:36:26+5:30
आपल्या दमदार अभिनयशैली आणि बेधडक वक्तव्यांमुळे कायम चर्चेत येणारा अभिनेता म्हणजे आस्ताद काळे.
आपल्या दमदार अभिनयशैली आणि बेधडक वक्तव्यांमुळे कायम चर्चेत येणारा अभिनेता म्हणजे आस्ताद काळे. आजवरच्या कारकिर्दीत आस्तादने अनेक मालिकांमध्ये काम केलं. मात्र, 'बिग बॉस मराठी' या रिअॅलिटी शोमुळे तो खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आला. इतकंच नाही तर या शोमध्ये त्याच्या खिलाडीवृत्ती, गेम खेळताना लढवलेली युक्ती यामुळे तो विशेष चर्चेत राहिला. यातच आस्ताद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नुकतेच एका मुलखतीमध्येत त्याने लिव्ह-इन रिलेशनशीप आणि पीजीमध्ये राहणाऱ्या तरुणाईवर भाष्य केलं. यासोबतच त्याने तरुणाईला एक मोलाचा सल्लाही दिला.
आस्तादने नुकतीच आरपार ऑनलाईन या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने खाजगी आणि व्यवसायीक आयुष्यावर मोकळेपणाने चर्चा केली. लिव्ह-इन रिलेशनशीपबद्दल तो म्हणाला, ' तुम्ही निवडलेल्या व्यक्तीसोबत लिव्ह इनमध्ये तर काही अलिखित नियम असतात. माणूस एकत्र असल्यावर खरा कसा आहे हे कळतं, माणसाच्या सवयी कळतात. पण हे खरंतर अवघड आहे, नवरा बायको किंवा पीजी म्हणून एकत्र राहायचं'.
पुढे तो म्हणाला, 'विशेष करुन मुलींसाठी हे खूप अवघड आहे. मुलांचं काही नसतं, मुलं राहतात. फार काही वाद झाले तर मुलांची 90 टक्के भांडणं ही ओल्ड मॉन्कवर मिटतात. पण मुलींच्या बाबतीत थोडं वेगळं असतं". आस्ताद एक उदाहारण देत म्हणाला, 'एक कोल्हापूरची मुलगी आणि एक नागपूरची मुलगी, या दोन संस्कृती वेगवेगळ्या संस्कृती आहेत. या दोगी एकत्र नांदायला लागतात, तेव्हा खटके होतात. तेव्हा तुमचा समजूतदारपणा कळतो. मी याच्यावरुन भांडणं ऐकली आहेत'. मग अशावेळी जेव्हा तुमचं जमत नसेल, तेव्हा जुळवून घेण्यासाठी एक करार करा. त्यामुळे मदत होते', असा सल्ला त्याने तरुणाईला दिला.