Prashant Damle: प्रशांत दामले यांनी वाढदिवसाच्या दिवशी मोठी घोषणा, म्हणाले- यापुढे...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2023 17:02 IST2023-04-05T16:56:40+5:302023-04-05T17:02:25+5:30
मराठी रंगभूमी जगलेला नट म्हणून प्रशांत दामलेंची ओळख आहे.

Prashant Damle: प्रशांत दामले यांनी वाढदिवसाच्या दिवशी मोठी घोषणा, म्हणाले- यापुढे...
मराठी रंगभूमी गाजवलेले नट असं म्हटलं तर आपल्या सर्वांसमोर एकच नाव उभं राहतं ते म्हणजे अभिनेते प्रशांत दामले (Prashant Damle) यांचं. आजवर प्रशांत दामलेंनी बऱ्याच नाटकात काम केले आहे. मराठी रंगभूमी जगलेला नट म्हणून प्रशांत दामलेंची ओळख आहे. प्रशांत दामले आज त्यांचा ६२ वा वाढदिवस आज साजरा करतायेत.
प्रशांत दामले यांनी आजवर अनेक नाटकांमधून बहुरूपी भूमिका साकारल्या आहेत. प्रशांत दामले सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या कलाकारांपैकी एक आहते. सोशल मीडियावर त्यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. मी एक महत्वाची घोषणा करत आहे. आमचं नाटक 'नियम व अटी लागू' ते आजपासून त्याचे जिथे कुठे प्रयोग असतील तिथे पुढच्या पाच सीट्स कॉलेज तरुणांसाठी फ्री मध्ये राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
कॉलेज तरुणांनी त्यांचं ओरिजिनल ID आणि प्रिंट आऊट प्रयोगाच्या १ तास आधी तिकीट खिडकीवर जमा करायचे. त्यांचा संपर्क क्रमांक द्यायचा. प्रशांत दामलेंच्या या निर्णयाचं सगळीकडे कौतुक होतंय. पिढीने नाटकांकडे आकर्षित व्हावे, म्हणून प्रशांत दामले यांनी घेतलेला निर्णय महत्वाचा आहे.
रंगमंच दणाणून सोडणारा प्रसिद्ध आणि तितकाच लोकप्रिय अभिनेता प्रशांत दामले यांनी त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीत अनेक दर्जेदार चित्रपट, नाटकं दिली आहेत. प्रशांत दामले यांच्याकडे आज गुणी आणि अभ्यासू अभिनेता म्हणून पाहिलं जातं.