रितेश देशमुखचा अमित व धीरज यांना पाठिंबा, विधानसभा निवडणुकीसाठी दिल्या खास शुभेच्छा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 16:27 IST2024-10-30T16:26:55+5:302024-10-30T16:27:38+5:30
अमित देशमुख आणि धीरज देशमुख यांनी अर्ज दाखल केल्यानंतर रितेशने दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत.

रितेश देशमुखचा अमित व धीरज यांना पाठिंबा, विधानसभा निवडणुकीसाठी दिल्या खास शुभेच्छा!
राज्यात सध्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीची शेवटची तारीख २९ ऑक्टोबर आहे. लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी तर लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून आमदार धिरज देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी दोघांबरोबर त्यांची आईही होती. आपल्या दोन्ही भावांसाठी अभिनेता रितेश देशमुखने खास पोस्ट केली आहे.
अमित देशमुख आणि धिरज देशमुख यांनी अर्ज दाखल केल्यानंतर रितेशने दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. रितेशने अमित देशमुख आणि धिरज देशमुख यांचा अर्ज दाखल करतानाचा फोटो शेअर केला आहे. त्याने कॅप्शनमध्ये "अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा अमित व धीरज भैय्या" असं लिहलं. रितेशने अद्याप राजकारणात एन्ट्री घेतलेली नसली तर तो कायम आपल्या दोन्ही भावांना साथ देत आला आहे.
अमित देशमुख, धीरज देशमुख आणि रितेश देशमुख हे आपले वडील दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचा वारसा मोठ्या जबाबदारीने पुढे नेत आहेत. अमित देशमुख हे २००९ पासून लातूर शहराचे आमदार आहेत. तर त्यांचे लहान भाऊ धीरज देशमुखदेखील मागील विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून निवडून गेले होते. तर रितेशने आपल्या अभिनयानं संपुर्ण महाराष्ट्राला आपल्या प्रेमात पाडलं आहे.