मानेला पट्टा, अडखळत बोलणं! संदीप पाठकला झालं तरी काय? व्हिडीओमुळे एकाच चर्चेला उधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2024 12:32 PM2024-01-12T12:32:13+5:302024-01-12T12:33:03+5:30
Sandeep pathak: संदीपची ही अवस्था पाहून चाहते काळजीत पडले आहेत.
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणजे संदीप पाठक. कधी विनोदी तर कधी गंभीर भूमिका साकारुन संदीपने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. नाटक, मालिका आणि सिनेमा यशा प्रत्येक माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या संदीपचा सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये त्याच्या मानेला पट्टा बांधलेला दिसून येत आहे. त्यामुळे त्या नेमकं झालं तरी काय हा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
संदीप कलाविश्वासह सोशल मीडियावरही चांगलाच सक्रीय आहे. त्यामुळे तो कायम नेटकऱ्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो. यात अनेकदा तो त्याच्या प्रोफेशनल लाइफ आणि पर्सनल लाइफमध्ये घडणाऱ्या गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करतो. नुकताच त्याने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याचा चेहरा सूजला असून मानेभोवती पट्टा गुंडाळला आहे. इतंकच नाही तर त्याला नीट बोलताही येत नाहीये. त्यामुळे चाहते काळजीत पडले आहेत. परंतु, संदीपा खरोखर काहीही झालं नसून हे त्याने फक्त एक मजेशीर व्हिडीओ करण्यासाठी केलं आहे.
संदीपने इन्स्टाग्रामवर एक मजेशीर रील शेअर केलं आहे. या रीलसाठी त्याने हा गेटअप केल्याचं म्हटलं जात आहे. सध्या सोशल मीडियावर “क्या पाना चाहते हो?”, “ससकसफुल होना चाहता हूँ". हा डायलॉग तुफान ट्रेंड होत आहे. या ऑडिओवर अनेक सेलिब्रिटींनी व्हिडीओ केले आहेत. त्यामुळे संदीपलाही हे रील करण्याचा मोह आवरला नाही आणि त्याने हा व्हिडीओ पोस्ट केला.
दरम्यान, रीलमधील डायलॉग ऐकून त्यातील कॅरेक्टर पोट्रे करण्यासाठी त्याने हा पट्टा लावल्याचं म्हटलं जात आहे. परंतु, हा पट्टा केवळ रीलसाठी आहे की खरोखरच त्याच्या मानेला काही झालंय हे अद्याप समोर आलेलं नाही. त्यामुळे चाहत्यांनी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये त्याला मानेभोवती पट्टा लावण्यामागचं कारण विचारलं आहे.