'चल जा तिथे उभा रहा...', संतोष जुवेकरने सांगितला शाहरुख खानच्या कंपनीतला तो किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2022 12:17 PM2022-08-06T12:17:11+5:302022-08-06T12:26:44+5:30
Santosh juvekar : अभिनेता संतोष जुवेकरची सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.
अनेक गाजलेल्या मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे संतोष जुवेकर(Santosh juvekar). 'झेंडा', 'मोरया', ' रेगे' यांसारख्या चित्रपटांच्या माध्यमातून संतोषने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे. दमदार अभिनयामुळे चर्चेत असणार संतोष सोशल मीडियावर सक्रीय असून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो. दरम्यान त्याची सोशल मीडियावर नुकतीच शेअर केलेली पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.
संतोष आलिया भटच्या डार्लिंग्स चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारतो आहे. संतोषने एक पोस्ट शेअर करत आपला अनुभव सांगितला. संतोषने यात करिअरचे सुरुवातीचे दिवस ते ‘डार्लिंग्स’ पर्यंतचा सांगितला आहे. वर्ष -१९९८. ठिकाण - दीप भवन, Dreams unlimited production (शाहरुख खान आणि जुही चावला production office)
मी office च्या बाहेर उभा राहून आत जाता येईल का कुणाला भेटता येईल का म्हणुन gate वर जाऊन विचारतो एका security gard ला तर तो मला ओरडून " चलो निकलो इधरसे चलो उधर खडे रहो, किसीने बुलाया होगा तोही अनेका. चलो निकलो........ आणि मी थोडासा नाराज होऊन पण थोडासा चिडून त्याला बोलतो " रुक तू....... एकदिन तुमलोगही gate खोलेगा मेरेलिये " असं बोलून त्या bulding जवळ थोड्यावेळ उभं राहून मी निघून जातो. पण मनात आणि डोक्यात एक स्वप्नं आणि तो अपमान कायम उराशी बाळगलेला.
मग काही वर्षांनतर मला एक call येतो " hi santosh sir m calling from redchillis entertainment can we meet? We want to cast u for our next film, if possible plz come to the office."
वर्ष -२०२०
ठिकाण - खार - सांताक्रूझ.
Redchillis entertainment pvt ltd (शाहरुख खान production office)
मी gate वर पोहोचतो माझ्या गाडीतून, गाडी gate च्या बाहेर parking साठी जागा शोधतोय तेव्हढ्यात call येतो " hi sir where r u? We r waiting for u." मी त्यांना सांगतो की मी आलोय खाली आहे parking साठी जागा शोधतोय तर तो मला म्हणतो अरे sir plz park inside wait m sending someone to assist u. आणि काही मिनटात office च gate उघडल जात security धावत माझ्या गाडीजवळ येतो आणि मला सांगतो "sir plz आईये." बास्स्स्सस्स्स्सस्स्स्सस्स्स्स....... 😊 ते शब्द कानावर पडतात आणि मला १९९८ चा संतोष दिसतो बाजूलाच उभा असतो तो कडक थाप मरतो पाठीवर तो माझ्या आणि म्हणतो " भाई य्ये मेरा शेर..... ज्जा जिले अपनी जिंदगी."
शारुख काकांच्या सिनेमांतलं त्यांच्या तोंडी असलेलं वाक्य. "कहते है अगर किसी चीज को दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है." आणि आपल्या मराठीत म्हण आहेच की देवाची करणी आणि नारळात पाणी 🙏🙏🙏
बस बाप्पा कडे एवढीच मागणी तू खूप देतोयस पण ते सांभाळण्याची बुद्धी आणि शक्ती सुद्धा दे महाराजा 🙏🙏
बाकी मला अजून मोठ्ठ करायला तुम्ही सगळे आहातच आवडलं तर शाब्बास म्हाना आणि नाही आवडलं तर कान पिळा पन हानू नका. संतोषची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होतेय.