'सगळंच कसं मनासारखं आणि...', अभिनेता संतोष जुवेकरच्या फोटो आणि कॅप्शननं वेधलं सर्वांचं लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2022 10:57 IST2022-07-18T10:57:29+5:302022-07-18T10:57:53+5:30
Santosh Juvekar : अभिनेता संतोष जुवेकर सोशल मीडियावरील पोस्टमुळे बऱ्याचदा चर्चेत येत असतो. आता तो पुन्हा चर्चेत आला आहे.

'सगळंच कसं मनासारखं आणि...', अभिनेता संतोष जुवेकरच्या फोटो आणि कॅप्शननं वेधलं सर्वांचं लक्ष
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता संतोष जुवेकर (Santosh Juvekar)ने विविध भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. संतोष जुवेकर सोशल मीडियावर सक्रीय असून तो या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असतो. दरम्यान त्याची सोशल मीडियावर नुकतीच शेअर केलेली पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. या पोस्टमध्ये त्याने एक फोटो शेअर केला आहे. या फोटोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
अभिनेता संतोष जुवेकर याने घराचा एक फोटो शेअर करत लिहिले की, सगळंच कस मनासारखं आणि आवडतं आहे ह्या फोटोत. माझं मनासारखं घर, माझ्या घरातली माझी आवडती एक जागा, मनासारखं वातावरण, आणि अगदी हवा तसा मनासारखा हा आलेला फोटो. संतोष जुवेकरने शेअर केलेल्या फोटोत त्याने घरातील बाल्कनीचा फोटो शेअर केला आहे. ज्यातून बाहेरचा नजारा पाहायला मिळतो आहे. त्याच्या या फोटोला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे. त्याच्या फोटोवर प्रसाद ओकची पत्नी मंजिरी ओकने वॉव अशी कमेंट केली आहे.
संतोष जुवेकरने मराठी-हिंदी चित्रपटांसोबतच अनेक मालिकांमध्येही काम केले आहे. या गोजिरवाण्या घरात, वादळवाट, ऊन-पाऊस, किमयागार या त्याच्या मालिका एकेकाळी तुफान गाजलेल्या आहेत. 'झेंडा', 'मोरया', ' रेगे' यांसारख्या चित्रपटांच्या माध्यमातून संतोषने रसिकांच्या मनावर छाप पाडली आहे. शेवटचा तो 'हिडन' या चित्रपटात झळकला आहे. हा चित्रपट ओटीटीवर रिलीज झाला असून यात त्याने एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे.