Video : शिकार सुद्धा होऊ शकता..., बेचकीच्या सहाय्याने बगळ्यांची शिकार, सयाजी शिंदेंचा संताप
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2022 03:48 PM2022-06-19T15:48:56+5:302022-06-19T15:58:57+5:30
Actor Sayaji Shinde Video : पडद्यावर नकारात्मक भूमिका साकारणारे सयाजी खऱ्या आयुष्यात मात्र हिरो आहेत. 10 लाखांवर वृक्षारोपण करणारे आणि देवराईला जनमानसात पोहोचवणारे हेच सयाजी शिंदे सध्या मात्र संतापलेले आहेत
Actor Sayaji Shinde Video : सिने अभिनेते, निसर्गप्रेमी सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांचा सिनेमातील खलनायक ते खऱ्याआयुष्यातील नायक इथपर्यंतचा प्रवास उभ्या महाराष्ट्राला ठाऊक आहेत. पडद्यावर नकारात्मक भूमिका साकारणारे सयाजी खऱ्या आयुष्यात मात्र हिरो आहेत. 10 लाखांवर वृक्षारोपण करणारे आणि देवराईला जनमानसात पोहोचवणारे हेच सयाजी शिंदे सध्या मात्र संतापलेले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत संताप व्यक्त केला आहे. ‘शिकार करता ना? शिकार सुद्धा होऊ शकता...,’ अशा शब्दांत त्यांनी आपला संताप बोलून दाखवला आहे.
मुंबईतील घाटकोपर मानखुर्द लिंक रोडवर पालिकेच्या नव्या उड्डाणपुलावर बगळ्यांची शिकार केली जात असल्याचा धक्कादायक व्हिडीओ त्यांनी फेसबुकवर शेअर आहे. घाटकोपर मानखुर्द लिंक रोडवर असलेल्या पालिकेच्या नव्या उड्डाणपुलावर बगळ्यांची शिकार केली जाते. हा प्रकार सयाजी यांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला. शिवाय शिकार करणाऱ्या मुलांना जाबही विचारला आहे. मात्र या मुलांनी बगळ्यांना घेऊन पळ काढला.
व्हिडीओत काही मुलं बगळ्याची शिकार करताना दिसत आहे. त्या बगळ्याला का मारले? असा जाब सयाजी मुलांना विचारत आहे. औषधासाठी मारल्याचं ती मुलं सांगत आहेत. या व्हिडीओनंतर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. काहींनी मात्र त्यांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी सोय करा, त्यांना मुख्य प्रवाहात आणा, अशी मागणी केली आहे. बोलून उपयोग नाही. भर रस्त्यात धुतला पाहिजे अशा हरामखोरांना.., असा संतापही काहींनी व्यक्त केला आहे.