सिद्धार्थ जाधव - कुशल बद्रिकेने कॉमेडी रील करता करता केली मोठी घोषणा, चाहत्यांना उत्सुकता

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2024 04:56 PM2024-07-20T16:56:40+5:302024-07-20T16:57:23+5:30

कुशल बद्रिकेच्या वाढदिवसानिमित्त सिद्धार्थने शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत आहे (kushal badrike, siddharth jadhav)

actor siddharth jadhav special birthday wish to kushal badrike jatra 2 movie | सिद्धार्थ जाधव - कुशल बद्रिकेने कॉमेडी रील करता करता केली मोठी घोषणा, चाहत्यांना उत्सुकता

सिद्धार्थ जाधव - कुशल बद्रिकेने कॉमेडी रील करता करता केली मोठी घोषणा, चाहत्यांना उत्सुकता

कुशल बद्रिके - सिद्धार्थ जाधव हे मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते. दोघेही गेल्या अनेक वर्षांपासून मराठी इंडस्ट्रीत कार्यरत आहेत. कुशल - सिद्धार्थ दोघांचंही फॅन फॉलोइंग खूप आहे. दोघेही विविध कलाकृतींमधून चाहत्यांना खळखळून हसवत असतात. अशातच कुशल - सिद्धार्थने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेयर करून चाहत्यांना गुड न्यूज देत आगामी सिनेमाची घोषणा केलीय. 

कुशलच्या वाढदिवसानिमित्त सिद्धार्थचा खास व्हिडिओ

सिद्धार्थ जाधवने नुकतंच सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केलाय. या व्हिडिओत पाहायला मिळतं की कुशल - सिद्धार्थ दोघेही 'जत्रा २' बद्दल बोलत आहेत. 'जत्रा २' मध्ये आमचा हा लूक असणार आहे. यावेळी शूटिंग लंडनमध्ये वैगरे करा असं दोघेही बोलताना दिसतात. पुढे कुशलला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना सिद्धार्थ म्हणतो, "हॅपी बर्थडे कुशल बद्रिके भावा.. मैत्रीच्या पलीकडचा मित्र.. असाच मॅड रहा आणि आपण असाच मॅडनेस ठेवूया.. लव्ह यू भावा (जत्रा २ येईल तेव्हा येईल.. आपण आपला स्ट्रगल चालू ठेवूया)

कुशल - सिद्धार्थचं वर्कफ्रंट

सिद्धार्थबे शेअर केलेल्या व्हिडिओवर अनेकांनी कुशलला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. दोघांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर कुशल नुकताच 'मॅडनेस मचायेंगे' या शोमध्ये दिसला. हेमांगी कवी आणि गौरव मोरेसोबत कुशलने अभिनय केलेला दिसला. दुसरीकडे सिद्धार्थ जाधव लवकरच 'नवरा माझा नवसाचा २' मध्ये पाहायला मिळणार आहे. दोघेही एकमेकांचे चांगले मित्र आहेत. कुशल - सिद्धार्थचा हा व्हिडीओ पाहून त्यांच्या फॅन्सना 'जत्रा २' ची उत्सुकता लागली आहे.

Web Title: actor siddharth jadhav special birthday wish to kushal badrike jatra 2 movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.