Subodh Bhave : अभिनेता सुबोध भावेनं घेतली पडद्यावरील प्रभू श्रीरामांची भेट, म्हणाला- कायमस्वरुपी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 02:26 PM2022-11-22T14:26:38+5:302022-11-22T14:33:36+5:30
Subodh Bhave: सुबोधनं शेअर केलेल्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशीच एक सुबोधची पोस्ट सध्या चर्चेत आली आहे.
आपल्या अभिनयाने रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवलेला अभिनेता म्हणजे सुबोध भावे(Subodh Bhave). नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमात आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर तो अधिराज्य गाजवतोय. सध्या सुबोध भावेने सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. सुबोधनं शेअर केलेल्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशीच एक सुबोधची पोस्ट सध्या चर्चेत आली आहे.
सुबोधनं ज्येष्ठ अभिनेते अरुण गोविल यांच्या सोबतच्या भेटीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
विक्रम - वेताळ आणि रामायण लहानपणी पाहिलेल्या आणि कायमस्वरुपी लक्षात राहिलेल्या या दोन मालिका.
त्यातील प्रमुख भूमिका साकारणारे " अरुण गोविल" सर. त्यांचा चाहता होतोच. त्यांच्या बरोबर काम करण्याची संधी मिळाली. मनपूर्वक धन्यवाद @siyaramkijai सर. तुम्ही सांभाळून घेतलं.तुम्हाला आणि तुम्ही साकारलेल्या प्रभू श्री राम यांना माझा 🙏🙏🙏🙏🙏
काही दिवसांपूर्वी रिलीज झालेले ‘हर हर महादेव’ चित्रपटात सुबोध भावे याने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती.
सुबोध भावे भूमिकेबद्दल...
"स्वराज्य व्हावे हीच श्रींची इच्छा असं आपण नेहमी ऐकतो, वाचतो. त्याप्रमाणेच मी ही भूमिका साकारावी, ही माझी किंवा दिग्दर्शकाची नाही तर प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांची इच्छा होती असं मला वाटतं. बावीस वर्षांपूर्वी जेव्हा मी मुंबईत आलो होतो, स्ट्रगल करत होतो त्यावेळी एका मालिकेसाठी मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी ऑडिशन दिली होती. त्यावेळी माझी निवड झाली नाही. महाराजांची ही भूमिका करण्यासाठी मला तब्बल २२ वर्षे वाट बघावी लागली. कदाचित महाराजांचीच ही इच्छा असेल की, मी माणूस म्हणून अजून प्रगल्भ व्हावं, अभिनेता म्हणून या भूमिकेसाठी अधिक तयार व्हावं, म्हणूनच एवढ्या कालावधीनंतर ही भूमिका माझ्याकडे आली. या भूमिकेला मी पूर्णपणे समर्पणाची भावना दाखवली म्हणूनच ती साकारणं शक्य झालं," असे सुबोध भावे भूमिकेबद्दल बोलताना म्हणाला.