"ज्येष्ठ कलाकारांना बसायला जागा नाही, पण इन्फ्लुएन्सरना…", सुयश टिळकने सांगितला त्याला आलेला वाईट अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2023 09:11 AM2023-07-04T09:11:16+5:302023-07-04T09:17:32+5:30

एका पुरस्कार सोहळ्यात आलेल्या वाईट अनुभवावर सुयश टिळकनं भाष्य केलं आहे.

Actor suyash tilak talk about senior actors did not get seat at the award function due to social media influencers | "ज्येष्ठ कलाकारांना बसायला जागा नाही, पण इन्फ्लुएन्सरना…", सुयश टिळकने सांगितला त्याला आलेला वाईट अनुभव

"ज्येष्ठ कलाकारांना बसायला जागा नाही, पण इन्फ्लुएन्सरना…", सुयश टिळकने सांगितला त्याला आलेला वाईट अनुभव

googlenewsNext


गेल्या काही काळापासून सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सनी आपला चांगलाच दबदबा निर्माण केला आहे. प्रत्येक सर्वाजनिक कार्यक्रमात, पुरस्कार सोहळ्यात त्याना आवर्जुन बोलवलं जातं. अनेक ठिकाणी त्यांना कलाकारांपेक्षा जास्त महत्त्व दिलं जातं. असाच एका प्रसंग सध्या चर्चेत आला आहे. एका पुरस्कार सोहळ्यात ज्येष्ठ मराठी कलाकारांना डावलून सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना बसायला जागा देण्यात आली होती असा खुलासा अभिनेता सुयश टिळकने आपल्या मुलाखतीत केला आहे. 

सुयश टिळकने नुकतंच सौमित्र पोटे यांना दिलेल्या मुलाखतीत आपल्याला आलेला वाईट अनुभव सांगितला. ''एका पुरस्कार सोहळ्यात ज्येष्ठ कलाकारांना बसायला खुर्च्या नव्हत्या. पण इन्फ्लुएन्सरची चांगली सोय करण्यात आली होती, असा किस्सा त्याने सांगितला आहे.

सुयश टिळकने व्यक्त केली खंत
मी एका पुरस्कार सोहळ्याला गेला होता. मला काही नॉमिनेश वैगरे नव्हतं, पण निमंत्रण आलं होतं. त्यामुळं गेलो होतो. तिथे गेल्यावर मला कळलं ज्यांना नॉमिनेशन होती त्यांना देखील बोलवलं नव्हतं. पण काही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्संना तिथं बोलवण्यात आलं होतं. त्यांच्या नावाच्या पाट्या असणाऱ्या खुर्च्यादेखील होत्या. आणखी एका पुरस्कार सोहळ्याला काही खूप ज्येष्ठ कलाकार जे ४०-५० वर्षे काम करतायेत. त्यांना बसायला जागा नव्हती, पण जे तरुण इन्फ्लुएन्सर होते त्यांना पहिल्या रांगेत त्यांच्या नावाच्या चिठ्ठ्या असलेल्या खुर्च्या बसवण्यात आलं होतं. मराठीतील ज्येष्ठ कलाकार यावर तक्रार देखील न करता, आपल्याला जागा मिळेल तिथं बसत होते. हे सगळे बघून मी तिथून १५ मिनिटात निघालो. 

एक सिनिअर कलाकार चिडल्या होत्या त्या म्हणाल्या मला बसायला खुर्चीच नाहीय. त्यांना मी माझी खुर्ची दिली आणि मी तिथून निघालो. ही गोष्ट माझ्या मनाला फार लागली.
 

Web Title: Actor suyash tilak talk about senior actors did not get seat at the award function due to social media influencers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.