"भाई किधर ? मंजिल ले जाए उधर..." उमेश कामतची नव्या कोऱ्या बाईकवरुन Road Trip, पाहा Video
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 12:08 IST2025-01-15T12:08:13+5:302025-01-15T12:08:32+5:30
अभिनेत्यानं सोशल मीडियावर Road Trip चा व्हिडीओ शेअर केला आहे.

"भाई किधर ? मंजिल ले जाए उधर..." उमेश कामतची नव्या कोऱ्या बाईकवरुन Road Trip, पाहा Video
Umesh Kamat Road Trip: अभिनेता उमेश कामत सध्या चर्चेत आहे. नवीन वर्षात उमेशनं जबरदस्त अशी बाईक खरेदी केली. आता या नव्या कोऱ्या बाईकवरुन उमेश थेट रोड ट्रीपवर गेला आहे. उमेश कामत हा अभिनेता मिहीर राजदा आणि अभिनेता संकेत कोर्लेकर यांच्यासोबत बाईक राईडवर गेला होता. त्याने नुकतंच सोशल मीडियावर Road Trip चा व्हिडीओ शेअर केला आहे.
उमेश कामतची ही रोड ट्रीप Totally Unplanned होती. याचा फोटो आणि व्हिडीओ अभिनेता संकेत कोर्लेकर शेअर केले आहेत. संकेतने पहिला फोटो शेअर करत लिहलं, "आम्ही निघालो २०२५ मधील आमच्या पहिल्या राईड वर". या फोटोत सकेंत, उमेश कामत आणि मिहीर राजदा हे आपल्या बाईकसोबत रायडर लुकमध्ये पाहायला मिळत आहेत. सकेंतने एक व्हिडीओ शेअर केलाय. ज्यात उमेशला तो विचारतो "भाई किधर ?' यावर उत्तरात उमेश म्हणतो, "मंजिल ले जाए उधर...". यावर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. सध्या त्यांची ही रोड ट्रीप चर्चेचा विषय ठरली आहे.
उमेशचा भटकंती हा आवडता छंद आहे. तो नेहमीच वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जाण्यास उत्सुक असतो. यात बाईक राइंडिंग हा त्याच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यानं नुकतंच Triumph Scrambler 400 ही बाइक विकत घेतली आहे. या बाईकची किंमत ३ ते चार लाखांच्या जवळपास आहे. आता या नव्या बाईकवरुन संपुर्ण महाराष्ट्र पिंजून काढायचा असं त्यानं ठरवलं आहे.