“एका राजकीय पक्षाच्या कार्यक्रमामुळे…” अभिनेता उमेश कामतची पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2022 01:25 PM2022-05-28T13:25:25+5:302022-05-28T13:27:37+5:30
सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असणाऱ्या उमेश कामतनं त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे, जी सोशल मीडियावर चर्चेत आहे.
मराठमोळा अभिनेता उमेश कामत (Umesh Kamat) म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय. या चॉकलेट बॉयचे चाहतेही असंख्य. मालिका, चित्रपट, वेबसीरिज या निमित्ताने उमेश सतत चर्चेत असतो. पण सध्या एका वेगळ्याच कारणानं त्याची चर्चा होतेय. उमेश कामत यांनी 'दादा एक गुड न्यूज' नाटका संदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे. जी सोशल मीडियावर चर्चेत आहे.
सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असणाऱ्या उमेश कामतनं त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. उमेशने आपल्या पोस्टमध्ये, ‘एका राजकीय पक्षाच्या कार्यक्रमामुळे ५ जूनचा चिंचवड येथील ‘दादा एक गुड न्यूज आहे’ या नाटकाचा प्रयोग रद्द. प्रेक्षकांचे तिकिटाचे पैसे परत करण्यात येतील.’
उमेश कामतची ही पोस्ट अभिनेत्री ह्रता दुर्गुळेनं देखील तिच्या इन्स्टा स्टोरीवर शेअर केलं आहे. हे नाटकं रंगभूमीवर सध्या चांगलंच गाजतंय. अल्पावधीतच या नाटकाने प्रेक्षकांना आपलंस करून अनेक पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली. परदेशातही या नाटकाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. बहीण -भावाच्या नात्यातील विश्वास, प्रेम एका अनोख्या रूपात या नाटकाच्या माध्यमातून आपल्याला अनुभवायला मिळतंय. यात उमेश कामत आणि ह्रता दुर्गुळे यांची मुख्य भूमिका आहे.
उमेशच्या ‘आणखी काय हवं’ वेबसीरिजला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद लाभला होता. यानंतर उमेश सोनी मराठीवरील ‘अजूनही बरसात आहे’ या मालिकेत दिसला. या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.