अभिनेते विद्याधर जोशींची पोस्ट चर्चेत, म्हणाले - 'माझे मित्र माझ्याकडे हिंदू धर्मद्रोही...'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2023 12:45 PM2023-12-27T12:45:54+5:302023-12-27T12:49:30+5:30

संपूर्ण इंडस्ट्रीत 'बाप्पा' म्हणून ओळखले जाणारे विद्याधर जोशी चर्चेत आले आहे. 

actor Vidyadhar Joshi's post On Social Media About use of loudspeakers to worship | अभिनेते विद्याधर जोशींची पोस्ट चर्चेत, म्हणाले - 'माझे मित्र माझ्याकडे हिंदू धर्मद्रोही...'

ज्येष्ठ अभिनेते विद्याधर उर्फ बाप्पा जोशींची पोस्ट चर्चेत

ज्येष्ठ अभिनेते विद्याधर जोशी यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. नाटक, मालिका, चित्रपट अशा तिन्ही क्षेत्रांमध्ये त्यांनी आपल्या दमदार अभिनयाचा ठसा उमटवला आहे. सोशल मीडियावर ते सक्रिय असतात. संपूर्ण इंडस्ट्रीत 'बाप्पा' म्हणून ओळखले जाणारे विद्याधर जोशी एका नवीन कारणांनी चर्चेत आले आहे. 

 विद्याधर जोशी यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली आहे. त्यांच्या या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधलं. पोस्टमध्ये त्यांनी लिहले, 'गेली दोन-तीन वर्ष तुमच्या बरोबर एक गोष्ट शेअर करायची होती. मी राहतो त्याच्या पलीकडे दोन गल्ल्या सोडून एका ठिकाणी दरवर्षी 26 जानेवारी, 1 मे, 15 ऑगस्ट, शिवजयंती (वर्षातून दोनदा),दत्त जयंती, हनुमान जयंती, कृष्णजन्म, राम जन्म (हा अलीकडे जोरात) आणि इतरही काही दिवशी सत्यनारायणाची महापूजा होते'.

पुढे ते लिहतात, 'लाऊड स्पीकर वरून मुलायम आवाजात मोठ्यांनी पूजा सांगितली जाते. त्याचा मला पूर्वीपासून त्रास व्हायचा. तो मी बोलूनही दाखवायचो..पण गेली काही वर्ष तो बोलून दाखवला तर माझे मित्र माझ्याकडे हिंदू धर्मद्रोही आणि पर्यायाने इतर प्रकारचा द्रोही ह्या नजरेने बघायला लागले आणि आधी 'ह्याच्यासारख्यांना कापलं पाहिजे' असं काहीसं म्हणायला लागले!!'.


ते म्हणाले, 'मी काय आयडिया केली गेली दोन-तीन वर्ष मी याच दिवशी माझ्या घरी सत्यनारायणाची पूजा करायला लागलो.सार्वजनिक पूजेच्या तिकडचा भट (किंवा भटजी, गुरुजी) याच्या पूजा सांगण्यावरूनच मी माझ्या घरी पूजा करायला लागलो!! मुलाला ते पूजा सांगणारे कधी येतायेत याच्यावर नजर ठेवायला सांगितली आणि ते आले की तो मला लगेच फोन करतो.. मी लगेच बसतो आणि पूजा त्यांच्या क्लाऊड स्पीकर वरून येणाऱ्या सूचना बहुकूम पूजा करून घेतो!!'.

 विद्याधर जोशी यांनी लिहले, 'हल्ली माझ्याबद्दलचा आदर समाजात वाढलेला दिसतो. ह्यावर्षी मला चौथीपर्यंतच्या मुलांच्या घेतलेल्या स्पर्धांचा बक्षिस वितरक म्हणून बोलावंल आहे. (वाचलेले दक्षिणेचे पैसे साठवून निदान पूजा सगणाऱ्यांकरता  योग्य प्रकारे आरत्या म्हणण्याचे आणि लाऊड स्पीकर चालवणाऱ्यांकरता साऊंड इंजिनिअरिंगचे वर्ग सुरू करावेत असं मनात आहे त्याची एक शाखा मशिदीतल्या लाऊड स्पीकरवाल्यां करता ही पुढे मागे चालू करण्याचा विचार आहे. इच्छुकांनी देणगी देण्यास हरकत नाही.फक्त ती रुपये पाच हजार आणि त्याच्या पटीत असावी)'. 


विद्याधर यांच्या या पोस्टवर चाहत्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने कमेंटमध्ये लिहले, 'कल्पना भारी आहे'. तर एकाने म्हटले,'खरंतर सर्वच धर्माच्या सर्व सार्वजनिक उत्सवावर बंदी घातली पाहिजे'. विद्याधर जोशींच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, बिग बॉस मराठीमध्येही दिसले होते. तर त्यांनी रितेश देशमुखच्या 'वेड' चित्रपटातही महत्त्वपूर्ण भूमिका केली आहे. 
 

Web Title: actor Vidyadhar Joshi's post On Social Media About use of loudspeakers to worship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.