/>शूटींगदरम्यान अमूक कलाकाराला झाली इजा, अशा शीर्षकाच्या अनेक बातम्या आपण ऐकतो. आपल्या कामात चोखपणा आणण्यासाठी भूमिकेत प्राण ओतणा-या प्रत्येक कलाकाराला अश्या घटनांना सामोरे जावे लागते. अशीच एक घटना लँडमार्क फिल्म्सच्या विधी कासलीवाल प्रस्तुत आणि नितीन वैद्य प्रॉडक्शन्स निर्मित 'गच्ची' या सिनेमातील अभिनेता अभय महाजनसोबत घडली.नचिकेत सामंत यांच्या दिग्दर्शनाखाली गच्चीवर झालेल्या या सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान अभय आपल्या भूमिकेत इतका गुंग झाला होता कि,तो गच्चीवरील एका कठड्यावर जोरात आदळला. आपली सहकारी कलाकार प्रिया बापटसोबतचा एक सीन शूट करीत असताना, अभयचा बेलेंस बिघडला, आणि थेट एका कठड्यावर त्याचा कपाळमोक्ष झाला. स्वतःला अभिनयात पूर्णपणे झोकून दिल्यामुळे बेसावध असलेल्या अभयला स्वतःचा तोल सांभाळता आला नाही. कठडा जोरात लागल्यामुळे त्याच्या कपाळावर भलीमोठी खोचदेखील पडली होती. जखम अधिक खोल असल्याकारणामुळे त्यावर टाके मारावे लागले होते. मात्र, शुटींगचा तिसराच दिवस असल्याकारणामुळे, संपूर्ण सिनेमा चित्रित होणे बाकी होता. त्यामुळे अभयच्या डोक्यावर पडलेले टाके संपूर्ण चित्रपटात दिसणार होते. असे होऊ नये, म्हणून अभयच्या कपाळावर प्लास्टिक सर्जरीदेखील करण्यात आली. सिनेमाच्या चित्रीकरणारंभालाच झालेल्या या अपघातामुळे, संपूर्ण युनिटदेखील हादरून गेले होते. मात्र 'शो मस्ट गो ऑन' म्हणत अभयने सर्वांना धीर देत नव्या जोमाने कामाला सुरुवात केली. येत्या २२ डिसेंबरला सर्वत्र प्रदर्शित होत असलेली 'गच्ची' वरील ही गोष्ट, सिनेरसिकांना मनोरंजांची मोठी मेजवानी देऊन जाणार आहे.
योगेश विनायक जोशी लिखित गच्चीवरील ही गोष्ट नेमकी काय आहे,ही जाणून घ्यायची उत्सुकता प्रेक्षकांना लागली असेल,यात शंका नाही.प्रिया बापट आता मुक्ता बर्वेसोबत ‘आम्ही दोघी’ या मराठी चित्रपटात देखील झळकणार आहे. त्या दोघींनी एकत्र काम करण्याची ही पहिलीच वेळ आहे. आम्ही दोघी ही आजच्या तरूणींच्या नातेसंबंधाची गोष्ट आहे. यात आई-मुलगी, मैत्रिणी, बाप–लेक प्रियकर-प्रेयसी अशा नात्यांना स्पर्श केला गेला आहे. प्रत्येक व्यक्तीने फक्त स्वतःच्या दृष्टिकोनातून विचार न करता समोरच्याचा दृष्टिकोनही ध्यानात घेतला पाहिजे ही बाब या चित्रपटात अधोरेखित करण्यात आल्या आहेत.
Web Title: The actor, who was on 'Gachchi', had to make a serious accident, plastic surgery
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.