या भूमिकांमुळे रमेश भाटकर यांना मिळाली प्रसिद्धी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2019 06:01 PM2019-02-04T18:01:02+5:302019-02-04T18:01:38+5:30
अभिनेते रमेश भाटकर यांचे मुंबईत निधन झाले. एलिझाबेथ हॉस्पिटल(नेपेन्सी रोड) मुंबई येथे अखेरचा श्वास घेतला. कर्करोगानं आजारी असल्यानं त्यांच्यावर एलिझाबेथ रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं आहे.
अभिनेते रमेश भाटकर यांचे मुंबईत निधन झाले. एलिझाबेथ हॉस्पिटल(नेपेन्सी रोड) मुंबई येथे अखेरचा श्वास घेतला. कर्करोगानं आजारी असल्यानं त्यांच्यावर एलिझाबेथ रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं आहे.
रमेश भाटकर यांनी छोट्या पडद्यावर पोलिसांच्या भूमिका प्रेक्षकांना विशेष पसंतीस पडल्या होत्या. तसेच हेलो इन्स्पेक्टर, कमांडर, तिसरा डोळा, हद्दपार, दामिनी', बंदिनी व युगांधरा या मालिकेत त्यांनी केलेल्या भूमिका गाजल्या.
१९७७ ला 'चांदोबा चांदोबा भागलास का' या चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी 'अष्टविनायक', 'दुनिया करी सलाम', 'आपली माणसं' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. रमेश भाटकर यांच्या माहेरची साडी या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत अनेक नवे विक्रम प्रस्थापित केले.
तू तिथे मी मालिकेत त्यांनी साकारलेली सक्त व काळजी घेणाऱ्या वडीलांची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात राहिली आहे.
त्यांनी नाटकातही दमदार भूमिकांतून रसिकांना चांगलीच भुरळ पाडली आहे. 'अश्रूंची झाली फुले' हे त्यांचे नाटक विशेष गाजले. 'केव्हातरी पहाटे', 'अखेर तू येशीलच', 'राहू केतू', 'मुक्ता' ही त्यांची काही गाजलेली नाटके. प्रेमाच्या गावा जावे व मी रेवती देशपांडे ही त्यांची नाटकं गाजली. तसेच परपुरूष या नाटकात त्यांनी नेहा पेंडसेच्या अपोझिट भूमिका केली होती. या भूमिकेलाही प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला.
गेल्याच वर्षी ९८ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनामध्ये रमेश भाटकर यांचा ‘जीवनगौरव’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला होता.
काही दिवसांपूर्वीच ते 'माझे पती सौभाग्यवती' या मालिकेत दिसले होते. यात त्यांनी केलेल्या बॉसच्या भूमिकेलाही प्रेक्षकांची दाद मिळाली.