'तुमच्या कपाळावर खूण कसली?' चाहत्यांच्या प्रश्नावर ऐश्वर्या नारकरांनी दिलं उत्तर, म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2023 18:23 IST2023-08-16T18:23:10+5:302023-08-16T18:23:48+5:30

Aishwarya narkar:ऐश्वर्या यांच्या कपाळावर नेमकं काय आहे? असा प्रश्न कायम चाहत्यांना पडत असतो. अखेर आज त्यांनी उत्तर दिलं.

actress-aishwarya-narkar-revealed-about-the-mark-which-is-on-her-forehead-know-about-it | 'तुमच्या कपाळावर खूण कसली?' चाहत्यांच्या प्रश्नावर ऐश्वर्या नारकरांनी दिलं उत्तर, म्हणाल्या...

'तुमच्या कपाळावर खूण कसली?' चाहत्यांच्या प्रश्नावर ऐश्वर्या नारकरांनी दिलं उत्तर, म्हणाल्या...

मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या नारकर. वय म्हणजे निव्वळ आकडा हे ऐश्वर्या यांच्याकडे पाहिल्यावर लक्षात येतं. साधारणपणे पन्नाशीच्या आसपास असलेल्या ऐश्वर्या त्यांच्या अभिनयासह फिटनेसमुळेही चर्चेत येत असतात. यातही सोशल मीडियावर त्यांचा चांगलाच वावर आहे. त्यामुळे त्यांनी अलिकडेच आस्क मी एनिथिंग हे सेशन घेतलं. यात चाहत्यांनी त्यांना असंख्य प्रश्न विचारले.

ऐश्वर्या कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे त्या त्यांचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असतात. यात कायम त्यांच्या बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोची चर्चा होते. परंतु, यावेळी त्यांनी चाहत्यांना दिलेल्या उत्तराची चर्चा होतीये.

ऐश्वर्या यांनी इन्स्टाग्रामवर आस्क मी एनिथिंग हे सेशन घेतलं. यात चाहत्यांनी त्यांना प्रोफेशनल लाइफसोबत पर्सनल आयुष्याविषयी देखील प्रश्न विचारले. यात एका चाहत्याने त्यांना थेट तुमच्या कपाळावर कसी खूण आहे? असा प्रश्न विचारला.  त्याच्या या प्रश्नाचं ऐश्वर्या यांनीही उत्तर दिलं.

“मॅम तुम्हाला ती कपाळावरची खूण खूप छान दिसते. सॉरी पण ते काय झालं आहे?” असा प्रश्न या चाहत्याने विचारला. त्यावर “#birthmark” असं उत्तर देत ती जन्मखूण असल्याचं सांगितलं. दरम्यान, या सेशनमध्ये चाहत्यांनी त्यांना त्यांचं वय, शिक्षण, खऱं नाव असे कितीतरी प्रश्न विचारले.
 

Web Title: actress-aishwarya-narkar-revealed-about-the-mark-which-is-on-her-forehead-know-about-it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.