अलका कुबल यांच्या पायलट लेकीची भरारी, पोस्ट शेअर करत म्हणाल्या-माझ्या मुलीने....

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2022 12:58 PM2022-10-08T12:58:21+5:302022-10-08T13:26:14+5:30

आई प्रसिद्ध अभिनेत्री असूनही त्यांच्या मुलींनी सिनेइंडस्ट्रीऐवजी वेगळ्या क्षेत्रात कार्यरत भरारी घेतली आहे.

Actress alka kubal pilot's daughter Eashanee bought a new car | अलका कुबल यांच्या पायलट लेकीची भरारी, पोस्ट शेअर करत म्हणाल्या-माझ्या मुलीने....

अलका कुबल यांच्या पायलट लेकीची भरारी, पोस्ट शेअर करत म्हणाल्या-माझ्या मुलीने....

googlenewsNext

'माहेरची साडी', 'लेक चालली सासरला', 'वहिनीची माया', 'बाळाचे बाप ब्रह्मचारी' अशा असंख्य चित्रपटांच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अलका कुबल. उत्तम अभिनयशैली, स्वभावातील नम्रपणा आणि साधेपणा यामुळे अलका कुबल यांनी कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं. अभिनेत्री अलका कुबल सिनेइंडस्ट्रीप्रमाणेच सोशल मीडियावरही सक्रीय असतात. अलीकडेच त्यांनी एक आपल्या मुलीबाबत पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेत्री अलका कुबल-आठल्ये आणि समीर आठल्ये यांना दोन मुली आहेत एकीचे नाव आहे ईशानी तर दुसरीचे नाव आहे कस्तुरी. या दोघी सिनेइंडस्ट्रीऐवजी वेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहे.  त्यांची मोठी मुलगी ईशानी ही पायलट आहे. काहीच महिन्यांपूर्वी तिचं लग्न सुद्धा झालंय. मात्र तिच्या आयुष्यात ती अनेक भराऱ्या घेताना दिसतेय. नुकतीच तिने तिची पहिली वहिली गाडी विकत घेतली आहे. स्वतः अलका कुबल यांनी तिला फोटो पोस्ट करत शुभेच्छा दिल्या आहेत. 

त्यांनी लिहिलंय, 
आज दसऱ्याच्या शुभ दिवशी माझ्या मुलीने तिची पहिली गाडी विकत घेतली. ईशानी-निशांत तुम्हा दोघांना खुप खुप शुभेच्छा.

इशानीचं काही महिन्यांपूर्वीचं निशांतशी लग्न झालंय. अगदी थाटामाटात त्यांचा लग्नसोहळा पार पडला होता. इशानीने अमेरिकेतून तिचं पायलटचं शिक्षण पूर्ण केलं होतं. तर आता भारतात ती पायलट म्हणून काम करतेय. याशिवाय अलका यांची दुसरी मुलगी कस्तुरी ही परदेशात एमबीबीएसचं शिक्षण घेतेयं. तिला डर्मेटोलॉजिस्ट व्हायचं आहे. 
 

Web Title: Actress alka kubal pilot's daughter Eashanee bought a new car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.