मध्यरात्री ३ वाजता ढसाढसा रडली अमृता; 'त्या' स्वप्नामुळे रात्रभर होती बेचैन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2023 16:33 IST2023-04-04T16:31:58+5:302023-04-04T16:33:51+5:30
Amruta Khanwilkar: अलिकडेच अमृताने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने 'मध्यरात्री उठून मी एकाएकी रडायला लागले', असं सांगितलं.

मध्यरात्री ३ वाजता ढसाढसा रडली अमृता; 'त्या' स्वप्नामुळे रात्रभर होती बेचैन
अमृता खानविलकर (Amruta Khanwilkar) गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत येत आहे. यात तिच्या फिल्मी करिअरपेक्षा तिच्या पर्सनल आयुष्याची जास्त चर्चा रंगताना पाहायला मिळते. अलिकडेच अमृताने एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने तिच्या प्रोफेशनल लाइफसोबत पर्सनल आयुष्यावरही भाष्य केलं.
अलिकडेच अमृताने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने 'मध्यरात्री उठून मी एकाएकी रडायला लागले', असं सांगितलं. तिच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर तिची चर्चा होऊ लागली आहे. "काल रात्री मला विचित्र स्वप्न पडलं. ज्यामुळे मला अचानक रडू कोसळलं. मी मध्यरात्री चक्क तीन वाजता ढसाढसा रडत होते", असं अमृताने या मुलाखतीत सांगितलं.
एका सिनेमासाठी १० लाख घेणाऱ्या अमृताचं नेटवर्थ किती माहितीये? एकूण प्रॉपर्टी पाहून व्हाल थक्क
दरम्यान, अमृता खानविलकर हे नाव सध्याच्या घडीला कोणासाठीही नवीन नाही. अमृताने मराठीसह बॉलिवूडमध्येही काम केलं आहे. त्यामुळे आज तिचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतो. अमृता लवकरच कलावती या सिनेमात झळकणार आहे.