'love you भुषण! You the best!' अभिनेत्री अनुषा दांडेकरची भूषण प्रधानसाठी खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 04:32 PM2024-05-14T16:32:44+5:302024-05-14T16:33:25+5:30

अनुषाने भूषण प्रधानसाठी खास पोस्ट करत त्याचं कौतुक केलं आहे. 

Actress Anusha Dandekar's special post for Bhushan Pradhan | 'love you भुषण! You the best!' अभिनेत्री अनुषा दांडेकरची भूषण प्रधानसाठी खास पोस्ट

'love you भुषण! You the best!' अभिनेत्री अनुषा दांडेकरची भूषण प्रधानसाठी खास पोस्ट

स्टायलिश अनुषा दांडेकर तिच्या ग्लॅमरस लुक्स आणि बोल्ड फॅशन स्टेटमेंटसाठी ओळखली जाते. अलिकडेच ती महेश मांजरेकर दिग्दर्शित 'जुनं फर्निचर' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.  हा चित्रपट १० एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला.  या सिनेमात अनुषा दांडेकर ही मराठी सिनेइंडस्ट्रीतील हॅण्डसम हंक भूषण प्रधानसोबत झळकली. यातच आता अनुषाने भूषण प्रधानसाठी खास पोस्ट करत त्याचं कौतुक केलं आहे. 

अनुषाने भूषण आणि तिचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यात तिनं कॅप्शनमध्ये लिहलं, 'मी जास्त चित्रपट केले नाहीत. मी मुख्यतः सूत्रसंचालन करत आले आहे. कोणत्याही कलाकाराचं सहकलाकार असणं ही एक वेगळी भावना असते, कारण तुम्हाला एक विशिष्ट पात्र साकारायचं असतं आणि त्यादरम्यान तुम्हाला नुकत्याच भेटलेल्या लोकांसोबत खूप वेळ घालवायचा असतो. हे अशा एका नात्याचे चक्र आहे, ज्यासाठी तुम्ही खरोखर तयार नसता'.

अनुषा पुढे म्हणाली, 'आज मला एका खास सहकलाकाराचे आभार मानायचे आहेत, ज्याने प्रत्येक पावलावर माझी मदत केली आणि मला धीर दिला. प्रोफेशनल असूनही त्याने मला उत्तम काम करण्यासाठी नेहमीच वेळ दिला आहे. सेटवर इतरांप्रमाणे आत्मविश्वासू नसणं हे खूप भीतीदायक असतं. पण, जेव्हा तुमच्याकडे अशी व्यक्ती असते जी तुम्हाला नेहमी प्रोत्साहन देत असते, तेव्हा तुम्ही कल्पनाही करू शकत नाही की तो सगळा प्रवास तुमच्यासाठी किती सोप्पा होऊन जातो.

अनुषा म्हणते, 'जेव्हा ते स्वत: उत्तम कलाकार असतात, पण ते तुम्हाला कधीच त्यांच्यापेक्षा कमी लेखत नाहीत; खरंच ही गोष्ट खूप मोठी असते आणि यासाठी धन्यवाद भूषण. माझा उत्तम सहकलाकार बनल्याबद्दल तुझे खूप आभार. भूषण तू मला खूप काही शिकवलंस. मी सदैव ऋणी राहीन. शूटिंगदरम्यान मला शब्द उच्चारण्यात अडचण येत होती, तेव्हा मी माझे डायलॉग्स पुन्हा पुन्हा बोलत होते, त्यावेळी तू कधीच माझ्यावर हसला नाहीस. त्याऐवजी मी ते बरोबर करेन याची खात्री करण्यासाठी तू मला जास्त वेळ दिलास'.

पुढे अनुषा लिहते, 'या चित्रपटानंतरही जेव्हा तू दुसर्‍या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र होतास, तेव्हा तू मला माझ्या प्रत्येक डायलॉगच्या व्हॉईस नोट्स पाठवल्यास, कारण मी माझं डबिंग उत्तमरित्या करू शकेन. तुला खूप सारे धन्यवाद, मला तुझ्याबरोबर काम करायला खूप आवडलं, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तु खूप भारी आहेस'. या पोस्टमुळे भूषण आणि अनुषाच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आलं आहे.

Web Title: Actress Anusha Dandekar's special post for Bhushan Pradhan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.