दोन घटस्फोट होऊनही तिस-यांदा लग्न करणार ही अभिनेत्री, तर दोन मुलांची आहे आई
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 03:22 PM2020-03-31T15:22:37+5:302020-03-31T15:25:26+5:30
'बादशाह', 'कोयला' यांसारख्या चित्रपटांमध्ये आणि बऱ्याच मालिकांमध्ये दीपशिखाने काम केले आहे.
कितने अजीब रिश्ते हैं यहाँ…. या गाण्याच्या ओळी चंदेरी दुनियेतील कलाकारांसाठी अगदी चपखल बसतात. कारण इथे कधी नवी नाती बनतात आणि कधी बनलेली नाती अगदी सहज तुटतात याचा काही नेम नाही. कधी एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे दुरावतात तर कधी एकमेकांची तोंडंही न पाहणारे बंधनात अडकतात. असंच काहीसं घडलं ते अभिनेत्री दीपशिखा नागपालबरोबर. दीपशिखा नागपालची तर कहाणीच वेगळी आहे. दीपिशिखाने तर दोन वेळा लग्न केले आणि दोन्ही वेळा घटस्फोटही झाला. दोन वेळा घटस्फोट घेऊनही तिस-यांदा लग्न करण्याच्या तयारीत दीपशिखा असल्याचे समजतंय.
विशेष म्हणजे दीपशिखाही दोन मुलांची आईदेखील आहे. मुलांची जबाबदारी आणि एकट्याने संसाराचा गाडा चालवणे आता दीपशिखाला चांगलच जड जात आहे. त्यामुळे तिला आता अचानक साथीदाराची गरज भासू लागली आहे. म्हणूनच ती सध्या चांगल्या मुलाच्या शोधात आहे. दीपशिखाची लव्हस्टोरी थोडी फिल्म वाटेली पण तेवढीच आश्चर्याचा धक्का देणारी आहे. दीपशिखाने ११९७ साली अभिनेता जीत उपेंद्र बरोबर लग्न केले आणि नंतर त्यांना एक मुलगा आणि मुलगी झाले. परंतु काही दिवसानंतर त्यांच्यामध्ये भांडण झाली आणि दोघीही वेगळे झाले.
२०१२ साली तिचे लग्न केशव अरोराबरोबर झाले. त्याच्याबरोबर ४ वर्ष राहिल्यानंतर त्यांच्यातही छोट्या छोट्या गोष्टींवरून खटके उडायला लागले. त्यांच्यामध्ये भांडण व्हायला सुरूवात झाली आणि तिने पुन्हा घटस्फोट देत एकटीच राहणे पसंत केले. विशेष म्हणजे दीपशिखा आणि केशव यांच्या नात्यात इतकी कटुता आली होती की, दीपशिखाने केशववर FIR देखील दाखल केली होती. कोर्टापर्यंत गेलेल या नात्याचे तसेही पुढे काही भविष्य नव्हते त्यामुळे अखेरीस हे नाते संपुष्ठात आले.
नेहीमीच कामात व्यस्त असल्यामुळे मुलांकडेही तिला लक्ष देणे जमत नाही. सिंगल मदर असल्यामुळे तिला पैसे कमावणे गरजेचे आहे. ती सतत कामानिमित्त बाहेरच असते. घटस्फोट झाल्यानंतर तिला आता एकटेपणा सतावत आहे. तसेच तिला कोणी समजणारा आणि ज्याच्यासह ती सुख दुःख शेअर करेल असा व्यक्ती मिळाला तर लग्न करण्याच्याही विचारात ती आहे. त्यामुळे दीपिशिखाची अवस्था पाहून कितने अजीब रिश्ते है यहाँ पे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. 'बादशाह', 'कोयला' यांसारख्या चित्रपटांमध्ये आणि बऱ्याच मालिकांमध्ये दीपशिखाने काम केले आहे.