या अभिनेत्रीला दिवसाला मिळायचे १०० रुपये,आता लाखोंमध्ये आहे कमाई!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2017 07:38 AM2017-11-27T07:38:03+5:302017-11-27T13:08:03+5:30
सेलिब्रिटी मंडळींवर रसिक जीव ओवाळून टाकतात. रसिकांचं या सेलिब्रिटींवर मनापासून प्रेम असतं. रसिकांच्या या प्रेमामुळेच सेलिब्रिटी मंडळी त्यांच्या करिअरमध्ये ...
स लिब्रिटी मंडळींवर रसिक जीव ओवाळून टाकतात. रसिकांचं या सेलिब्रिटींवर मनापासून प्रेम असतं. रसिकांच्या या प्रेमामुळेच सेलिब्रिटी मंडळी त्यांच्या करिअरमध्ये कोट्यवधींची कमाई करतात. दर महिन्याला सेलिब्रिटी गलेलठ्ठ कमाई करतात. करिअरच्या सर्वोच्च शिखरावर असताना होणा-या कमाईचा आकडा पाहून अनेकांना धक्काही बसतो. आता सध्या अशाच एका अभिनेत्रीची चर्चा रंगत आहे.मात्र तिच्या सध्याच्या कमाईवरून नाहीतर तिच्या पहिल्या कमाईचा आकडा ऐकताच सारेच आश्चर्यचकित होताना दिसत आहेत.ती दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे 'फॅशन का है जलवा' म्हणत रुपेरी पडद्यावर एंट्री मारणारी, पहिल्याच सिनेमातून रसिक आणि समीक्षकांवर जादू करणारी, फॅशन जगताचं वास्तव मांडणा-या दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्या सिनेमातून रुपेरी पडद्यावर पदार्पण करणा-या या अभिनेत्रीचं नाव म्हणजे मुग्धा गोडसे. पहिल्या सिनेमातील याच भूमिकेसाठी मुग्धाला सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्काराने गौरवण्यात आलं. मात्र एक अभिनेत्री बनण्यापर्यंतचा मुग्धाचा प्रवास सहज आणि सोपा नव्हता. २६ जुलै १९८६ रोजी एका मध्यमवर्गीय कुटुंबात मुग्धाचा जन्म झाला. पुण्यातील कॉलेजमधून तिने वाणिज्य शाखेची पदवी मिळवली. अर्थशास्त्र या विषयाची तिला आवड असून त्याचा ती अभ्यास सातत्याने करत असते. तिने २००२ ग्लॅडरॅग्स मेगा मॉडेल हंट ही स्पर्धा जिंकली होती. मात्र मॉडेलिंग आणि यानंतर बॉलिवूडपर्यंत पोहचण्यासाठी तिला प्रचंड मेहनतही घ्यावी लागली. हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवण्याआधी तिने एका पेट्रोलपंपावरही काम केले आहे.यासाठी तिला दिवसाचे १०० रुपये मिळायचे. याबाबत फार कमी जणांना माहिती असून खुद्द मुग्धानेच एका मुलाखतीदरम्यान याचा खुलासा केला आहे.त्यामुळे यशशिखरापर्यंत पोहचण्यासाठी प्रत्येकालाच कठोर मेहनत घ्यावी लागते हे यावरुन पुन्हा समोर आले आहे. फॅशन सिनेमाच्या यशानंतर मुग्धाने फॅशन दुनियेसह हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. जेल, ऑल द बेस्ट, हिरोईन अशा विविध सिनेमातही मुग्धाने आपला अभिनय आणि सौंदर्याने रसिकांची मने जिंकली.सध्या राहुलदेव आणि मुग्धा या दोघांच्या अफेअरच्याही चर्चा जोर धरत आहेत. दोघांच्याही वयात १८ वर्षांचा फरक असून राहुल ४८ वर्षांचा आहे तर मुग्धा ३१ वर्षांची.