अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी सोडवणार ‘केस नंबर ००२’
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2021 07:18 PM2021-10-27T19:18:57+5:302021-10-27T19:19:24+5:30
केस नंबर ००१ च्या पहिल्या सीझनला प्रचंड यश मिळाल्यानंतर आता दुसरा सीझन भेटीला आला आहे.
लेखिका सायली केदार यांच्या केस नंबर ००१ च्या पहिल्या सीझनला मिळालेल्या प्रचंड यशानंतर या मालिकेचा दुसरा सीझन प्रख्यात अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी यांच्या आवाजात स्टोरीटेल मराठीवर प्रदर्शित होत आहे. 'केस नंबर ००२' विषयी लेखिका सायली केदार सांगतात "केस नंबरचा पहिला सिझन लिहिताना त्यावर मी आणि माझ्या पब्लिशर सई तांबेनी बरेच काम केले होते. श्रोत्यांना कसे खिळवून ठेवता येईल हे प्रत्येक एपिसोडमध्ये काटेकोरपणे बघत होतो. सिरीज रिलीज झाली तेव्हा आम्ही केलेल्या कामाबद्दल समाधानी होतो पण कसा प्रतिसाद येईल याबद्दल खूप उत्सुकता होती. मात्र सीरिज भरपूर तास ऐकली गेली आणि कमेंट्सचा, मेसेजेचा आणि इमेल्सचा पाऊस पडला. लोकांना ती गोष्ट खूपच आवडली आणि ती अगदी अनपेक्षितपणे बराच काळ बेस्ट सेलर्समध्ये झळकली.
अर्थातच दुसरा सीझन लिहीताना माझ्या स्वतःकडून आणि लोकांच्या या सिरीजकडून, त्या पात्रांकडून बऱ्याच अपेक्षा होत्या आणि आहेत. मुख्य पात्र इन्सपेक्टर निरंजन प्रभु हेच असल्याने आणि त्याची तपासाची, कामाची पद्धत तीच असल्यानी थोडा नोस्टॅलजीसुद्धा सिझन २ मध्ये आहे. स्टोरीटेलच्या टीमबरोबर काम करताना खूप मजा आली.आम्हाला काम करताना जशी मजा आली तशीच श्रोत्यांनाही ऐकताना मजा यावी येईल, असे सायली केदार म्हणाल्या.
गीतांजली कुलकर्णीने दिला सीरिजला आवाज
गीतांजली कुलकर्णी यांनी या सीरिजला आवाज दिला आहे, त्यांच्या या अनुभवाबद्दल त्या म्हणाल्या, "‘केस नंबर ००२’ चा अनुभव यासाठी चांगला होता कारण की सई आणि सायली दोघीही खूप मन लावून काम करतात. आम्ही एकत्र मिळून खूप चर्चा केल्या, त्या खूप इनपुट्स देतात, त्यामुळे असे नाही वाटत की तिथे आपण फक्त आहोत. आपल्याला मदत करायला खूप लोक असतात. छोट्या छोट्या गोष्टींकडेसुद्धा लक्ष देतात. हे पात्र तसेच साउंड नाही ना होत आहे, वेगळे वाटतेय ना? तर त्यामुळे काम करताना जे सुरुवातीला अस्पेशिअली गरज असते. आपल्याला एक्झॅक्टली पात्राचा आवाज त्याच्या टेम्प्रामेंटप्रमाणे त्याचे बोलणे ठरवायचे असते. तेव्हा मदत झाली खूप सईची आणि सायलीची. आणि नंतर अर्थातच तुम्हाला अंदाज येतो आणि मग तुम्ही शोधून काढता कि कसे असेल हे पात्र आणि तुम्ही करत जाता. हे एक टीम वर्क आहे. केस नंबर ००२ मधील थरार, भीती, प्रेम प्रसंग, असे अनेक प्रसंग आणि त्यातील भाव रेकॉर्ड करताना मला फार मजा आली. ऑडिओबुक रेकॉर्डिंगची प्रोसेसच मला मेडिटेटिंग वाटते"