'मराठमोळी श्रीवल्ली!' 'पुष्पा 2' च्या गाण्यावर हेमांगी कवीचा साडी नेसून धमाकेदार डान्स

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2024 11:35 AM2024-06-02T11:35:20+5:302024-06-02T11:36:29+5:30

हेमांगी कवीने 'पुष्पा 2' च्या गाण्यावर भन्नाट डान्स केलाय. हेमांगीच्या या पारंपरिक डान्सला चाहत्यांनी पसंती दिली आहे (pushpa 2, hemangi kavi)

actress Hemangi Kavi dance in saree on Pushpa 2 song saami | 'मराठमोळी श्रीवल्ली!' 'पुष्पा 2' च्या गाण्यावर हेमांगी कवीचा साडी नेसून धमाकेदार डान्स

'मराठमोळी श्रीवल्ली!' 'पुष्पा 2' च्या गाण्यावर हेमांगी कवीचा साडी नेसून धमाकेदार डान्स

'पुष्पा 2' सिनेमाची उत्सुकता शिगेला आहे. अल्लू अर्जुन पुन्हा एकदा 'झुकेगा नही साला' म्हणत प्रेक्षकांचं मनोरंजन करायला सज्ज आहे. 'पुष्पा' च्या पहिल्या भागातील गाणी चांगलीच गाजली. आता 'पुष्पा 2' मधील दुसरं गाणं सामीची झलक काही दिवसांपुर्वी दिसली. या नव्या गाण्यातील रश्मिका मंदाना आणि अल्लू अर्जुन यांची डान्स स्टेप चांगलीच हिट झालीय. याच गाण्यावर अभिनेत्री हेमांगी कवीने मराठमोळ्या अंदाजात डान्स केलाय.

'पुष्पा 2' च्या गाण्यावर मराठमोळ्या श्रीवल्लीचा डान्स

'पुष्पा 2' ची गाणी सध्या चांगलीच गाजत आहेत. अशातच काही दिवसांपुर्वी 'पुष्पा 2' मधील सामी गाण्याचं नवीन व्हर्जन लॉंच झालं. या गाण्याच्या म्यूझिक व्हिडीओमध्ये अल्लू अर्जून आणि रश्मिकाची डान्स स्टेप चांगलीच व्हायरल झाली. आता याच गाण्यावर मराठमोळ्या हेमांगी कवीने खास डान्स केलाय. पिवळ्या रंगाची साडी आणि त्यावर गुलाबी रंगाचा ब्लाऊज नेसून 'पुष्पा 2'च्या गाण्यावर हेमांगी कवीने पारंपरिक अदा दाखवत खास डान्स केलाय. हा डान्स चांगलाच व्हायरल झाला असून हेमांगीला चाहत्यांनी पसंती दिली आहे. 

'पुष्पा 2' विषयी...

काही दिवसांपुर्वी 'पुष्पा 2' मधील नवीन गाणं रिलीज झालं. 'अंगारो के अंबर सा मेरा सामी...' असे गाण्याचे बोल आहेत. या गाण्याचा मेकिंग व्हिडिओ रिलीज करण्यात आला आहे. म्हणजे बिहाइंड द सीन्स यामध्ये दाखवण्यात आले आहेत. नेहमीप्रमाणे गाण्यात हटके स्टेप्स प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या आहेत. गणेश आचार्य यांनी ही कोरिओग्राफी केली आहे. दिग्दर्शक, कोरिओग्राफरसोबत ऑफ कॅमेरा झालेली मजामस्तीही यात दिसत आहे. गाण्याचे बोल, कोरिओग्राफी, रश्मिकाचा क्युट लूक तर अल्लू अर्जुनचा स्मार्ट लूक चाहत्यांना प्रेमात पाडणारा आहे. 'पुष्पा 2' १५ ऑगस्टला रिलीज होणार आहे.

Web Title: actress Hemangi Kavi dance in saree on Pushpa 2 song saami

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.