'कुणाला खरा वाघ म्हणायचं?...' शिवसेनेतील अंतर्गत वादावर हेमांगी कवीची पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 12:35 PM2022-06-24T12:35:52+5:302022-06-24T12:37:14+5:30
Hemangii Kavi: राज्यात राजकीय घटनांना उधाण आलं असतानाच मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवीने यावर भाष्य केलं आहे.
राज्यात मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेत उभी फूट पडली आहे. शिंदे समर्थक ४० हून अधिक आमदारांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार नको अशी भूमिका घेत महाराष्ट्र हितासाठी निर्णय घेणे गरजेचे असं म्हटलं आहे. तर दुसरीकडे मी मुख्यमंत्री नको असेन तर मला येऊन सांगा, मी राजीनामा द्यायला तयार आहे अशी भावनिक साद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना घातली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येतात. याच दरम्यान मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangii Kavi)ने यावर भाष्य केलं आहे.
हेमांगी कवी नेहमीच राजकीय घडामोडींवर आपलं मतं सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडत असतो. यावेळी तिने आता कुणाला खरा वाघ म्हणायचं? अशी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. तिच्या या पोस्टवर यूजर्सनी विविध प्रतिक्रिया दिल्या असून सध्या त्याच्या या पोस्टची जोरदार चर्चा रंगली आहे.
दरम्यान, बंडखोर १२ आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी शिवसेनेने विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे केली आहे. त्यासाठी दिलेल्या पत्रामध्ये एकनाथ शिंदे, तानाजी सावंत, प्रकाश आबिटकर, बालाजी किणीकर, अनिल बाबर, लता सोनवणे, यामिनी जाधव, संजय शिरसाठ, संदीपान भुमरे, महेश शिंदे, भरत गोगावले आणि अब्दुल सत्तार यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी आहे. शिवसेनेने बोलविलेल्या बैठकीला हे सदस्य उपस्थित नसल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.