"ही लढाई इतिहासात लिहिण्यासारखी...", क्रांती रेडकरने पती समीर वानखेडेंना पाठिंबा देत मांडली भूमिका!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2023 18:01 IST2023-05-27T13:25:08+5:302023-05-30T18:01:02+5:30
क्रांती रेडकर या लढाईत पती समीर वानखेडे यांच्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे.

"ही लढाई इतिहासात लिहिण्यासारखी...", क्रांती रेडकरने पती समीर वानखेडेंना पाठिंबा देत मांडली भूमिका!
आर्यन खान ड्रग्सप्रकरणी एनसीबीचे माजी झोनल अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) सध्या चर्चेत आहेत. सीबीआयच्या चौकशीच्या भोवऱ्यात ते अडकले आहेत. दरम्यान शाहरुख खानसोबतचे त्यांचे चॅट्सही समोर आलेत. अनेक गोष्टी त्यांच्याविरोधात जात असताना वानखेडेंची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर (Kranti Redkar) खंबीरपणे पाठीशी उभी आहे. यासंदर्भात शुक्रवारी रात्री मीडियाशी बोलताना क्रांती रेडकरनं आपली भूमिका स्पष्ट केली.
काय म्हणाली क्रांती?
क्रांती रेडकर हातात छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा घेऊन माध्यमांसमोर आली. क्रांती म्हणाली, महाराजांच्या प्रतिमेपेक्षा मोठं ऊर्जास्थान दुसरं काहीही नाही. प्रत्येक मराठी माणसासाठी हेच ऊर्जास्थान आहेत. महाराजांची प्रतिमा जेव्हा तुम्ही हातात घेता, तेव्हा १०० हत्तींचं बळ तुम्हाला मिळतं. समीर वानखेडे देशसेवा करत आहेत. यात माझाही खारीचा वाट आहे. मी नक्कीच आयुष्यभर त्यांच्या पाठिशी असेन, मरेपर्यंत लढेन'', क्रांती रेडकर यावेळी म्हणाली.
पुढे क्रांती म्हणाली, “ही लढाई इतिहासात लिहिण्यासारखी आहे. त्यात जर माझं नाव अगदी बारीक अक्षरात जरी आलं, तरी मी स्वत:ला अभिमानी समजेन. देव आपल्यासमोर आव्हानं ठेवतच असतो. त्याला फक्त आपण सामोरं जायचं”, असं क्रांती म्हणाली.
याआधी क्रांतीने समीर वानखेडे यांनी त्यांच्या कारकिर्दीत केलेल्या चांगल्या कामांचा एकत्रित व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये वानखेडे यांनी कस्टम डिपार्टमेंटमध्ये असताना तसंच एनसीबीत असताना त्यांनी ज्या कारवाया केल्या त्याचे फोटो, पेपरमधील फोटो यांचा एकत्रित व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला तिने 'मन सुद्ध तुझं' हे मराठी गाणं लावलं आहे. 'तू तुझा वेळ, ऊर्जा देशासाठी सेवा करण्यात घालवावा अशीच माझी कायम इच्छा आहे' असं कॅप्शन तिने व्हिडिओला दिलं.