"Twins होणारेत हे मला माहितच नव्हतं", क्रांती रेडकरचा प्रेग्नंसीबद्दल खुलासा, म्हणाली- "सोनोग्राफीला गेले तेव्हा..."
By कोमल खांबे | Updated: April 11, 2025 14:09 IST2025-04-11T14:09:23+5:302025-04-11T14:09:55+5:30
आपल्याला जुळ्या मुली होणारेत हे क्रांतीला माहितच नव्हतं. जुळी मुलं होणारेत हे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर क्रांतीला धक्काच बसला होता.

"Twins होणारेत हे मला माहितच नव्हतं", क्रांती रेडकरचा प्रेग्नंसीबद्दल खुलासा, म्हणाली- "सोनोग्राफीला गेले तेव्हा..."
क्रांती रेडकर ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. जत्रामधील कोंबडी पळाली गाण्यामुळे ती प्रसिद्धीझोतात आली होती. क्रांतीने खूप कमी वयातच अभिनयात करिअर करायला सुरुवात केली होती. माझा नवरा तुझी बायको, फक्त लढ म्हणा, जत्रा, करार, फूल ३ धमाल अशा अनेक सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे. सध्या क्रांती मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. क्रांती अनेक व्हिडिओ शेअर करते. या व्हिडिओतून ती तिच्या जुळ्या मुलींच्या गमतीजमती सांगत असते.
छबील आणि गोदू या क्रांतीच्या जुळ्या मुलींच्या मजेशीर गोष्टी चाहत्यांनाही ऐकायला छान वाटतात. पण, आपल्याला जुळ्या मुली होणारेत हे क्रांतीला माहितच नव्हतं. जुळी मुलं होणारेत हे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर क्रांतीला धक्काच बसला होता. प्लॅनेट मराठीला दिलेल्या मुलाखतीत क्रांतीने हा किस्सा सांगितला. क्रांती म्हणाली, "मी सोनोग्राफीला गेले होते. जे सोनोग्राफी करतात त्या डॉक्टरला वाटलं की मला माहीत आहे की मला जुळे होणार आहेत. सोनोग्राफी करत असताना ती टीव्हीवर बघून मला सांगत होती की पहिल्या गर्भाची वाढ चांगली आहे. दुसरा गर्भही चांगला वाढतोय".
पुढे क्रांती म्हणाली, "मग मी तिला विचारलं पहिला गर्भ आणि दुसरा गर्भ म्हणजे?? तेव्हा तिने मला सांगितलं की तुला जुळे होणार आहेत. मला धक्काच बसला होता. तिने मला विचारलं की तुला माहीत नव्हतं का? तेव्हा मी तिला सांगितलं की नाही. ही गुडन्यूज समीरला कधी देतेय असं मला झालं होतं. त्याला मला छान सरप्राइज द्यायचं होतं. पण मला राहवलंच नाही. मी तिथूनच त्याला व्हिडिओ कॉल केला. आणि त्याला सांगितलं की आपल्याला जुळे होणार आहेत. त्याच्या रिअॅक्शन बघण्यासारखा होत्या. आम्ही २ वर्ष मूल होण्यासाठी प्रयत्न करत होतो. आणि त्यानंतर तुम्हाला कळतं की जुळे होणारेत तर आमचा आनंद दुप्पट झाला होता".