दादरमधील या ७५ वर्षे जुन्या घरात आजी-आजोबांसोबत राहते अभिनेत्री मिथिला पालकर

By तेजल गावडे | Published: November 11, 2020 11:04 AM2020-11-11T11:04:17+5:302020-11-11T11:05:29+5:30

फार कमी लोकांना माहित आहे की अभिनेत्री मिथिला पालकर तिच्या आजी आजोबांसोबत दादरमधील ७५ वर्षे जुन्या बिल्डिंगमध्ये राहते.

Actress Mithila Palkar lives with her grandparents in this 75 year old house in Dadar | दादरमधील या ७५ वर्षे जुन्या घरात आजी-आजोबांसोबत राहते अभिनेत्री मिथिला पालकर

दादरमधील या ७५ वर्षे जुन्या घरात आजी-आजोबांसोबत राहते अभिनेत्री मिथिला पालकर

googlenewsNext

'गर्ल इन द सिटी' आणि 'लिटील थिंग्स' या वेबसिरीजमधील भूमिकांमुळे ‘वेब क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री मिथिला पालकर हिने मराठी सिनेसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्ये कमी कालावधीत आपली ओळख निर्माण केली आहे. कपच्या तालावरील तिचे ‘हिची चाल तुरु तुरु...’ नेटिझन्ससह रसिकांनाही भावले होते. मात्र तेव्हापासून एक अभिनेत्री म्हणून तिने मिळवलेले यश नक्कीच कौतुकास्पद म्हणावे लागेल. एक उत्स्फूर्त आणि कायमच आपल्या आनंदी चेहऱ्यानं घायाळ करणारी अभिनेत्री म्हणूनही तिच्याकडे पाहिले जाते. इतकेच नाही तर आपल्या अभिनयाची जादूही मिथीलाने दाखवून दिली आहे.

फार कमी लोकांना माहित आहे की अभिनेत्री मिथिला पालकर तिच्या आजी आजोबांसोबत दादरमधील ७५ वर्षे जुन्या बिल्डिंगमध्ये राहते.

लॉकडाउनमध्ये मिथिलाने आजी आजोबांसोबत वेळ व्यतित केला. तिने तिच्या घरातील आणि आजी आजोबांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

मिथिलाच्या घराबाहेरील पॅसेजमध्ये झोपाळादेखील आहे. तिला या झोपाळ्यावर बसून टाइम स्पेन्ड करायला खूप आवडतो. बऱ्याचदा तिथे बसून अँम्पल वाजवते.

तिने घराबाहेरील पॅसेजमध्ये ग्लॅमरस फोटोशूट केले आहे. हे फोटो सोशल मीडियावर पहायला मिळत आहेत. 


इरफान खानसोबत 'कारवां' सिनेमातून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या सिनेमातील तिच्या भूमिकेचेही विशेष कौतुक झाले होते.

तर मराठीत मुरांबा या चित्रपटातून रसिकांना चांगलीच भुरळ पाडली.

मिथिला अभिनेता अभय देओलसोबत नेटफ्लिक्सवरील सिनेमा 'चॉपस्टिक'मध्ये झळकली होती.

आता ती लवकरच अजय देवगण निर्मित 'स्त्रीभंग'मध्ये दिसणार आहे.

Web Title: Actress Mithila Palkar lives with her grandparents in this 75 year old house in Dadar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.