अभिनेत्री मुक्ता बर्वेनं पहिल्या घराला दिलं मैत्रीणचं नाव, कोण आहे तिची ही सखी ?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 12:30 PM2024-05-17T12:30:10+5:302024-05-17T12:31:36+5:30
अभिनेत्री मुक्ता बर्वेचा आज वाढिदवस आहे.
मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री म्हणून मुक्ता बर्वे हिचे नाव आवर्जून घेतले जाते. मराठी नाटक, मालिका, चित्रपट अशा तिन्ही माध्यमांतून अभिनेत्री मुक्ता बर्वे हिने आजवर प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. आपल्या अभिनयामुळे नेहमीच चर्चेत असणारी अभिनेत्री मुक्ता बर्वेचा आज वाढिदवस आहे. तुम्हाला माहितेय का मुक्ता बर्वेनं तिच्या घराला एका खास मैत्रिणीच नाव दिलं आहे. तर आज तिच्या वाढदिवसानिमित्त आपण तो किस्सा जाणून घेऊया...
मुक्ता सध्या तिच्या ‘नाच गं घुमा’ या चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. तिचा हा चित्रपट १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
या सिनेमाच्या प्रमोशनसाठी विविध ठिकाणी मुलाखती देत आहे. अशातच तिनं महाराष्ट्र टाईम्सला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये मुक्तानं तिच्या खास मैत्रिणीबद्दल सांगितलं. मराठी इंडस्ट्रीमधील एक नावाजलेली लेखिका मुक्ताची खास मैत्रिण आहे. मुक्ताच्या घरालाही तिचं नाव दिलेलं आहे. विशेष म्हणजे या मैत्रिणीनं वेळोवेळी साथ दिल्याचं मुक्तानं सांगितलं.
ही खास मैत्रीण दुसरी-तिसरी कोणी नाही तर मधुगंधा कुलकर्णी ही आहे. मुलाखतीमध्ये मधुगंधाविषयी बोलताना मुक्ता म्हणाली, 'ललित केंद्रापासून आमची मैत्री आहे. आम्ही काम पहिल्यांदा एकत्र केलंय. पण, आमची मैत्री अनेकवर्षांची आहे. म्हणजे माझ्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टींमध्ये मधू माझ्याबरोबर होती. आयुष्यातील माझं पहिलं घर मी मधुमुळेच घेऊ शकले. मी तिला म्हटलं होतं की माझ्या घराला मी तुझं नाव देईल. अगदी छोटं घर आहे माझं आणि त्या घराला मी माझं नाही तर मधुचं नाव दिलं आहे. 'मधुकृपा' असं नावं मी घराला दिलं आहे. आयुष्यात असे काही खूप कमी मित्रमैत्रीणी असतात ज्याच्यात कुठलाही स्वार्थ नसतो'.
मधुगंधा ही अभिनयाबरोबर एक उत्तम लेखिकाही आहेत. तिच्या लेखणीतून साकार झालेला एलिझाबेथ एकादशी चित्रपट चांगलाच गाजला. लेखनाबरोबर तिने अनेक चित्रपटांची निर्मितीही केली आहे. तिची निर्मिती असलेला आत्मपॅम्फ्लेट चित्रपट काही महिन्यांपूर्वी भेटीला आला होता. शिवाय 'नाच गं घुमा' सिनेमाची लेखिकाही मधुगंधा आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला.