VIDEO : पूजा सावंतने खरेदी केलं नव घर, खास मित्राने दाखवली झलक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2022 16:53 IST2022-06-19T16:50:51+5:302022-06-19T16:53:24+5:30
Pooja Sawant New Home : होय, पूजाच्या बेस्ट फ्रेंडने ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. शिवाय पूजाच्या घराची झलक दाखवणारा एक व्हिडीओही शेअर केला आहे.

VIDEO : पूजा सावंतने खरेदी केलं नव घर, खास मित्राने दाखवली झलक
अभिनेत्री पूजा सावंत ( Pooja Sawant) म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीचा लाडका व लोकप्रिय चेहरा. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत पूजा सावंत अभिनयाच्या क्षेत्रात आली आणि बघता बघता आघाडीची अभिनेत्री बनली. पूजाच्या वडिलांनी अनेक मराठी नाटकांमधून काम केलं. वडिलांकडूनच तिला अभिनयाचा वारसा मिळाला. 2008 साली पूजाने श्रावणक्वीन ही स्पर्धा जिंकली आणि तिचा चेहरा सर्वांच्या नजरेत भरला. या गोड चेहऱ्यानं अनेकांची मनं जिंकली. या स्पर्धेचा जज असलेल्या सचित पाटीलने पूजाचा अभिनय आणि नृत्यकौशल्य पाहून तिला आपल्या ‘क्षणभर विश्रांती’ या चित्रपटासाठी विचारणा केली. पूजानेही लगेच होकार दिला आणि मराठी सिनेमात तिची एन्ट्री झाली. ‘क्षणभर विश्रांती’ हा पूजाचा पहिला सिनेमा अपार गाजला. या सिनेमानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही.
होय, पूजाचा बेस्ट फ्रेंड व अभिनेता भूषण प्रधानने ( Bhushan Pradhan) ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. शिवाय पूजाच्या घराची झलक दाखवणारा एक व्हिडीओही शेअर केला आहे.
व्हिडीओमध्ये पूजा, भूषण, गश्मीर महाजनी, श्रेय सावंत, गौरी देशमुख आदी दिसत आहेत. सगळेच पूजाने नवीन घर खरेदी केल्याच्या आनंदात मस्तपैकी धम्माल करताना या व्हिडीओत दिसत आहेत. ‘पू तुझ्या नव्या घरासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. तुला तुझ्या या नव्या घरात नेहमीच आनंद मिळो. घर नेहमी आनंद हास्य आणि प्रेमानं भरुन जावो. पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन सावंत....,’ असं भूषणने हा व्हिडीओ शेअर करताना लिहिलं आहे.
भूषण आणि पूजा हे दोघंही चांगले मित्र आहेत. अनेकदा त्यांचं नातं अनेकवेळा मैत्रीच्या पुढे असलेलं दिसून आलं. यावरून दोघं नात्यात असल्याची चर्चाही ऐकायला मिळाली. पण दोघांनी कधीच त्यांच्या नात्याविषयी भाष्य केलेलं नाही. आम्ही फक्त चांगले मित्र आहोत, असंच दोघं बोलत आले.