"आपण खरंच सुसंकृत आहोत...?" प्राजक्ता माळीची नवी पोस्ट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2022 15:37 IST2022-06-22T15:32:53+5:302022-06-22T15:37:54+5:30
Prajakta Mali ''आपण खरंच सुसंकृत आहोत...?, प्राजक्ताने शेअर केलेली ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर कमालीची व्हायरल होत आहे. तसंच या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंटचा पाऊस पाडला आहे.

"आपण खरंच सुसंकृत आहोत...?" प्राजक्ता माळीची नवी पोस्ट चर्चेत
अभिनेत्री प्राजक्ता माळी(prajakta mali) हे नाव सध्याच्या घडीला कोणत्याही व्यक्तीसाठी नवीन नाही. मालिकांपासून करिअरची सुरुवात करणारी प्राजक्ता सध्याच्या घडीला अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये झळकत आहे. सध्या प्राजक्ता तिच्या रानबाजार या वेबसीरिजमुळे चर्चेत येत आहे. या सीरिजमध्ये पहिल्यांदाच प्राजक्ताचा बोल्ड अंदाज पाहायला मिळाला. त्यामुळे सोशल मीडियावर ती सातत्याने चर्चेत येत आहे. यामध्येच आता प्राजक्ताने एक पोस्ट शेअर केली आहे.
प्राजक्ता माळीने तिचे 'वाय' सिनेमासंबंधी पोस्ट शेअर केली आहे. ''आपण खरंच सुसंकृत आहोत...?, 'ती' चा थरारक प्रवास, 'वाय' येतोय फक्त २ दिवसात...'' असा कॅप्शन तिने या व्हिडीओसोबत दिलं आहे. २४ जूनपासून 'वाय' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या सिनेमांची सोशल मीडियावर चर्चा आहे.
काय आहे नेमका ‘Y’? ‘वाय’ हा एक थरारपट आहे. हायपरलिंक... हायपरलिंक...असं सारखं म्हटलं जातंय. साध्या भाषेत याचा अर्थ सांगायचा झाल्यास एका टाईमलाईनमध्ये, एकाच वेळेत अनेक ठिकाणी घडलेले प्रसंग शेवटी एका गोष्टीला येऊन मिळतात. अनेक नद्या एकत्र येऊन समुद्र तयार होतो. तसा हा हायपरलिंक सिनेमा असणार आहे. यासाठी खूप तगडा स्क्रीनप्ले असण्याची गरज असते आणि जो आमच्या लेखक टीम आणि दिग्दर्शकाने चांगलाच बांधलाय.
छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा प्राजक्ता माळीच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत. सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य, दिलकश अदा आणि लक्षवेधी स्टाईल यामुळे प्राजक्ता अल्पावधीतच रसिकांची आवडती अभिनेत्री बनलीये.