"कुठे गेलीत nttu करमत नाही...", प्राजक्ता माळीच्या फोटोवर चाहत्यांची भन्नाट कमेंट्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2022 16:36 IST2022-09-23T16:30:28+5:302022-09-23T16:36:15+5:30
प्राजक्ता माळीची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या पोस्टवर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.

"कुठे गेलीत nttu करमत नाही...", प्राजक्ता माळीच्या फोटोवर चाहत्यांची भन्नाट कमेंट्स
छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा प्राजक्ता माळी (Prajakta Mali) च्या अभिनयावर रसिक फिदा आहेत. सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारे सौंदर्य, दिलकश अदा आणि लक्षवेधी स्टाईल यामुळे प्राजक्ता अल्पावधीतच रसिकांची आवडती अभिनेत्री बनलीये. प्राजक्ता सोशल मीडियावर किती अॅक्टिव्ह आहे, हे नव्यानं सांगायची गरज नाही. प्राजक्ता सतत नवनव्या पोस्ट शेअर करत असते. सध्या प्राजक्ता महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करते आहे. कार्यक्रमाचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला काही दिवसांपूर्वीच आलायं. या कार्यक्रमातून ब्रेक घेऊन आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी प्राजक्ता लंडनला गेली आहे.
अभिनेत्रीनं इंस्टाग्रामवर एक पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. प्राजक्ताने तिचे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताना सेटवरच्या आठवणी असं कॅप्शन तिनं दिलं आहे. अगदी लहान मुलांसारखी निरागसता कुठून आणतेस ग चेहेऱ्यावर, मी तुझ्या प्रिय गोड हृदयाच्या चित्रपटाची वाट पाहत आहे, प्राजा च्या ह्या पात्राचे नाव काय असेल ??, कुठे गेलीत nttu करमत नाही तुमच्या पर्यंत भावना पोहचल्या शिवाय.. Miss u nttu, अशा कमेंट्स तिच्या या फोटोवर चाहत्यांनी केल्या आहेत.
वर्कफ्रंट...
प्राजक्तासोबत या सिनेमात अलोक राजवाडे, संकर्षण कऱ्हाडे, वैभव तत्ववादी सिनेमात प्रमुख भूमिकेत आहेत. तर अभिनेता ऋषिकेश जोशी सिनेमाचं दिग्दर्शन करत आहे.