प्रार्थना बेहरेमध्ये अभिनयासह दडली आहे ही कला, जाणून घ्या कोणती आहे ती कला?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 07:46 PM2021-03-25T19:46:42+5:302021-03-25T19:51:08+5:30
रुपेरी पडद्यावर मराठीतील दिग्गज अभिनेत्यांसह प्रार्थना बेहरेची केमिस्ट्री चांगलीच जुळली. छोट्या पडद्यावरही तिने आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे.
कलाकार मंडळी अभिनयासह इतर गोष्टींमध्येही तितकेच पारंगत असतात. वैयक्तिक आयुष्यात अभिनयासह निरनिराळ्या गोष्टी करणं कलाकारांना आवडतं. शुटिंगच्या रोजच्या बिझी शेड्युअलमध्ये स्वतःसाठी वेळ घालवत कलाकार त्या क्षणाचा आनंद घेत असतात. प्रत्येक कलाकाराला जीवनात काही ना काही छंद असतो. कुणाला जेवण बनवणं, कुणाला गायनाचा तर कुणाला फिरण्याचा छंद असतो. असाच काहीसा छंद मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहरेलाही आहे.
ती एक उत्तम चित्रकार असल्याचं समोर आले आहे. नुकतंच तिने सोशल मीडियावर एक पेंटिंग पोस्ट केले आहेत. विशेष म्हणजे घराच्या भींतीवरच तिने हे पेंटींग बनवले आहे. तिनं काढलेले हे पेटींग पाहून तुम्हालाही आश्चर्याचा सुखद धक्का बसेल. हे पेटींग पाहून चाहत्यांनीही भरभरुन लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत. चाहत्यांसोबत अनेक कलाकारांनीही तिच्या कलेचं कौतुक करताना दिसत आहेत.
'कॉफी आणि बरंच काही, मिस्टर अँड मिसेस सदाचारी, व्हॉट्स अॅप लग्न अशा सिनेमांमधून प्रार्थनाने आपल्या अभिनयाने मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःचं अढळ स्थान निर्माण केले आहे. रुपेरी पडद्यावर मराठीतील दिग्गज अभिनेत्यांसह प्रार्थना बेहरेची केमिस्ट्री चांगलीच जुळली. छोट्या पडद्यावरही तिने आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. सोशल मीडियावरही ती प्रचंड सक्रीय असते. तिच्या आयुष्यातील प्रत्येक घडामोडी ती चाहत्यांसह शेअर करत असते.
आजवर प्रार्थनाने वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. मात्र चित्रपटांची निवड करताना प्रार्थना सध्या विचारपूर्वक निर्णय घेते. चित्रपटसृष्टीत एंट्री करताना वाट्याला आलेले चित्रपट तिने पटापट निवडले. यावेळी स्क्रीप्ट काय, दिग्दर्शक कोण, कलाकार कोण, भूमिका काय, निर्माता कोण असा विचार कधीच केला नसल्याचे प्रार्थनाने कबूल केले आहे. चित्रपटात नवनवीन करण्याच्या विचाराने तसं केल्याचंही ती सांगते. मात्र आता चित्रपटांची निवड करताना विचारपूर्वक निर्णय घेते असं प्रार्थनाने म्हटलं होते. या कामात पतीही तितकीच मदत करतो असंही तिने सांगितले होते. कुणी काही सांगितलं तरी जे पटतं तेच करते असंही तिने स्पष्ट केले होते.