पाहा कुठे भटकंती करतेय रसिकांची लाडकी अभिनेत्री प्रिया मराठे, पतीसोबत करते क्वॉलिटी टाईम एन्जॉय
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2021 03:06 PM2021-02-13T15:06:18+5:302021-02-13T15:09:59+5:30
प्रिया मराठेने ताडोबा अभयारण्यातल्या काही प्राण्यांचे फोटोजही शेअर केले आहेत. ‘स्टार्टर एन्जॉय करा, मेनकोर्स अजून यायचा आहे’, अशा आशयाचं कॅप्शनही तिने या फोटोजला दिले आहे.
सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे अभिनेत्री प्रिया मराठेने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली. प्रिया सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते. आपल्या खासगी आणि मालिकाबद्दलची माहिती ती फॅन्ससह शेअर करते. ती आपले फोटोसुद्धा फॅन्ससह शेअर करत असते आणि त्यांच्याशी संवादही साधत असते.
नुकतंच तिने शेअर केलेला काही फोटो तिच्या फॅन्ससाठी चर्चेचा विषय ठरतायेत. प्रिया सध्या चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अभयारण्यात भटकंती करत असून येथील फोटो तिने शेअर केले आहेत. निवांत क्षणांचा आनंद घेतानाचा आनंद प्रियाच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत आहे. या फोटोमध्ये ती पती शंतनू मोघेसोबत क्वालिटी टाइम एन्जॉय करताना दिसत आहे.
भटकंती कुणाला नाही आवडत... आपल्यापैकी प्रत्येकालाच फिरायला आवडतं. आपल्या आजूबाजूच्याच नाही तर देश आणि जगातील विविध पर्यटनस्थळांना भेट द्यायला प्रत्येकालाच आवडतं. या पर्यटनस्थळी निवांत क्षण घालवणं प्रत्येकालाच भावतं. विविध पर्यटनस्थळांची सफारी आपल्यापैकी प्रत्येकालाच आवडते.
सर्वसामान्यांप्रमाणे सेलिब्रिटीसुद्धा त्यांच्या शुटिंगच्या निमित्ताने किंवा कार्यक्रमांच्या निमित्ताने फिरत असतात. त्यामुळे अनेकदा प्रिया मराठे अशा प्रकारे वेळेत वेळ काढून वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देताना दिसते. तिने ताडोबा अभयारण्यातल्या काही प्राण्यांचे फोटोजही शेअर केले आहेत. ‘स्टार्टर एन्जॉय करा, मेनकोर्स अजून यायचा आहे’, अशा आशयाचं कॅप्शनही तिने या फोटोजला दिले आहे.
अभिनयासोबतच तिला भटकंतीची फार आवड आहे. शूटिंगच्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून ती आवर्जून वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देते.या फोटोला नेटिझन्सकडून बरेच लाइक्स आणि कमेंट्सही मिळत आहेत