हैं रे मैं तेरे कुर्बान! अफेअरच्या चर्चांनंतर रिंकू राजगुरुचं ते खास Reel चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2022 06:47 PM2022-02-03T18:47:53+5:302022-02-03T18:48:30+5:30

Rinku rajguru: सध्या रिंकू एका प्रसिद्ध अभिनेत्याला डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. यामध्येच तिने एक रिल शेअर केल्यामुळे तिची पुन्हा नव्याने चर्चा रंगली आहे.

actress rinku rajguru looking beautiful in saree | हैं रे मैं तेरे कुर्बान! अफेअरच्या चर्चांनंतर रिंकू राजगुरुचं ते खास Reel चर्चेत

हैं रे मैं तेरे कुर्बान! अफेअरच्या चर्चांनंतर रिंकू राजगुरुचं ते खास Reel चर्चेत

googlenewsNext

रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) हे नाव सध्याच्या घडीला कोणत्याही व्यक्तीसाठी नवीन नाही. सैराट ( sairat) या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली रिंकू रातोरात सुपरस्टार झाली. विशेष म्हणजे या चित्रपटामुळे रिंकू संपूर्ण महाराष्ट्राची आर्ची झाली. त्यामुळे रिंकू चाहत्यांमध्ये कायमच चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून रिंकू त्या प्रोफेशनल लाइफपेक्षा पर्सनल लाइफमुळे चर्चेत येत आहे. रिंकू एका प्रसिद्ध अभिनेत्याला डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. यामध्येच तिने एक रिल शेअर केल्यामुळे तिची पुन्हा नव्याने चर्चा रंगली आहे.

सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या रिंकूने काही वेळापूर्वीच इन्स्टाग्रामवर एक रिल शेअर केलं आहे. या व्हिडीओमध्ये तिने 'कजरा महोब्बतवाला' या गाण्यावर सुंदर एक्स्प्रेशन्स दिले आहेत. हा व्हिडीओ शेअर करत तिने Old songs are just my mood and heart, असं कॅप्शन दिलं आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून रिंकू तिच्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत येत आहे. अलिकडेच रिंकूने सैराटफेम आकाश ठोसरसोबत फोटो शेअर केला होता. यात ते दोघं डिनर डेटला गेले होते. हे फोटो पाहिल्यावर ते दोघं एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा रंगली आहे.
 

Web Title: actress rinku rajguru looking beautiful in saree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.